रत्नागिरी- संगमेश्वर येथे नोकरी व्यवसायानिमित्त असणारे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील रहिवासी असलेले, सध्या संगमेश्वर येथे स्थायिक असलेले समाज बांधव, तसेच मुंडे साहेबाविषयी आदर असणारे. यांच्या उपस्थितीत, गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायमचं घर करून असलेलं राजकारणी व्यक्तीमत्व… १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांची जयंती होती. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त संगमेश्वर येथील नावडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात पोलीस,डॉक्टर, शिक्षक, विध्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. प्रथमत: डॉ. मनोहर ढाकणे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली व उपस्थित असलेले मुंडे प्रेमी यांची मनोगते व्यक्त करण्यात आली
या मनोगता तुन भारताचे पुर्व केंद्रीय ग्रामविकास मंञी, माजी उपमुख्यमंञी, माजी गृहमंत्री
जनसामान्याचाआवाज,दिनदूबळ्यांचा आधारवड,शेतकर्यांचे कैवारी,लोकनेते दैवत स्व गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करुन त्यांच्या आठवणी जागृत झाल्या.
या कार्यक्रमासाठी डॉ. मनोहर ढाकणे, डॉ. किशोर ढाकणे,श्री प्रकाश कोळेकर, डॉ खाडे अंगद ,संगमेश्वर येथील पोलीस कॉन्स्टेबल गणेश बिक्कड,तेजस वानखेडे,चांगदेव जगताप,चौरे गणेश,घुगे रोहित,आनंद फाळके ,डॉ. विरभद्र बेलुरे, धनाजी भांगे, विजय कांबळे आदीची उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धनाजी भांगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ किशोर ढाकणे यांनी केले अशा रीतीने कार्यक्रम संपन्न झाला.