नशिबात असेल तर एका रात्रीत कोट्यधीश होऊ शकतो. याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथील कुंभार कुटुंबाला आला आहे.सातवीत शिकणाऱ्या अवघ्या 12 -13 वर्षाच्या मुलाने ड्रीम 11 या प्लेइंग अॅपवर क्रिकेट गेम खेळून एक कोटींची रक्कम जिंकली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूडच्या सक्षम बाजीराव कुंभार या इयत्ता 7 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने ‘ड्रीम इलेव्हन’ या ऑनलाईन खेळात कोट्याधीश जिंकल्याचा दावा केला आहे. काल रात्री त्याच्या वडिलांच्या अकाउंटवर जिंकलेली रक्कम कर वजा करता 70 लाख रुपये जमा झाल्यानंतर गावात एकच जल्लोष करण्यात आला. त्याचे वडील बाजीराव कुंभार हे महावितरणमध्ये कर्मचारी आहेत.
सक्षम बाजीराव कुंभार हा ‘ड्रीम इलेव्हन’ अॅपवर एक कोटी जिंकल्यानंतर त्याच्या कुटुंबाने एकच जल्लोष केला.