

राजापूर, रत्नागिरी : शिळ भंडारवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात निष्काळजी पणामुळे एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दिप्तेश प्रभाकर कदम यांच्याविरोधात भारतीय दंड विधान
कलम ४२९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिळ भंडारवाडी येथील नळ पाणीपुरवठा
योजनेच्या खोदलेल्या चरामध्ये घडली होती. याप्रकरणी गायीचे मालक सचिन सुधाकर बिर्जे (वय ४०, रा. शिळ भंडारवाडी, ता. राजापूर) यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, दिप्तेश प्रभाकर कदम यांनी नळ पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईनचे काम घेतले होते. मात्र, त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण केले नाही आणि पाईपलाईनसाठी खोदलेले चर तसेच उघडे ठेवले. याच चरामध्ये सचिन बिर्जे यांच्या मालकीची तांबड्या रंगाची गिर जातीची गाय पडून तिचा मृत्यू झाला. आरोपीला या घटनेची माहिती देऊनही त्याने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही आणि त्यामुळे बिर्जे यांचे मोठे नुकसान झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीच्या या बेजबाबदार आणि निष्काळजी पणामुळे गायीचा मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दिवसाच्या संघर्षाला यश…
सचिन बिर्जे गेली अनेक दिवस संघर्ष करत आहे . सदर विषयाला धरून त्याने आमरण उपोषण केले होते . एक मे रोजी आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला होता . शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश आले असून आज त्यातील पहिली पायरी म्हणून गुन्हा दाखल करायची प्रोसेस झाली आहे . गुन्हा घडल्यानंतर बराच कालावधी उलटूनही फिर्यादी आज गुन्हा दाखल करण्यासाठी आल्याने पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून घेतला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.
लवकरच औषधांच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होण्याचा विश्वास..
औषधाच्या गर व्यवहार संदर्भातील चौकशी चालू असून करायचे या संदर्भ मध्ये पण कारवाई होईल असे विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुरांच्या गोळ्याचा गैरव्यवहारतून विक्री केल्याची तक्रारी त्यांनी दिली आहे. संबंधातील पुरावे ही सादर करण्यात आलेले आहेत. त्याची चौकशी चालू असून लवकरच सत्य पुढे येईल असे त्यांनी म्हटले आहे. गेली अनेक दिवस संघर्ष करत असून लोकशाही पद्धतीने न्याय मिळवत आज पहिली स्टेप पूर्ण झाली आहे. लवकरच यासंदर्भामध्येही गुन्हा दाखल होईल असा विश्वास सचिन यांना आहे. सदर विषयामध्ये काम करत असताना अधिकारी आपल्या अधिकाऱ्याला वाचवण्याचे काम करत असतात असे दिसून आले आहे. बँकेचे कर्ज असल्याने प्रचंड नुकसान सचिन बिर्जे यांचे झाले होत. आता न्याय मिळेल असा त्यांना खात्री वाटत आहे.