रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने काढला हैदराबादचा वचपा, घरच्या मैदानावर केलं पराभूत…

Spread the love

हैदराबाद- आयपीएल 2024 स्पर्धेच्या 41 व्या सामन्यात सनराझर्स हैदराबादच्या वाटेला पराभव आला आहे. तळाशी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादच्या 35 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबाद धक्का बसला आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफसाठीची धडपड सुरु असताना बरेच ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. आयपीएल 2024 स्पर्धेच्या 41 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचं पारडं जड होतं. मात्र या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादला पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 7 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 दिल्या होत्या. पण सनरायझर्स हैदराबादला 8 गडी गमवून 171 धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादला 35 धावांनी पराभूत केलं. या विजयासह गुणतालिकेवर प्रभाव पडला आहे. रॉयल चॅलेंजर्सचं प्लेऑफचं गणित अजूनही कायम आहे. तर सनरायझर्स हैदराबादचं मात्र टेन्शन वाढलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली, रजत पाटीदार आणि कॅमरोन ग्रीन यांनी जबरदस्त फलंदाजी केली. विराट कोहलीने 43 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. रजत पाटीदारने 20 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. तर कॅमरून ग्रीन 37 धावा करत नाबाद राहीला. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने 2, टी नटराजनने 2, कमिन्स आणि मार्केंडेने प्रत्येकी एक गडी बाद केला.

आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. ट्रेव्हिस हेडच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघी एक धाव करून हेड तंबूत परतला. त्यानंतर खेळाडू बाद होण्याची रांग लागली. पॉवर प्लेमध्ये बंगळुरुने हैदराबादचे आघाडीचे चार फलंदाज बाद केले. अभिषेक शर्मा 31, एडन मार्करम 7 आणि हेन्रिक क्लासेन 7 धावा करून बाद झाले. नितीश रेड्डीही काही खास करू शकला नाही आणि 13 धावा करून तंबूत परतला. अब्दुल समाद 10, पॅट कमिन्स 31 धावा करून बाद झाले.

🔹️दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

▪️रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन):

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल. इम्पॅक्ट प्लेयर्स: स्वप्नील सिंग

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन):

अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन. इम्पॅक्ट प्लेयर्स: ट्रॅव्हिस हेड.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page