दिवा:- महानगर सफाई कर्मचारी संघ(महाराष्ट्र) अध्यक्ष भारत गायकवाड यांनी ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी रोहिदास मुंडे यांची निवड केलेली आहे सफाई कामगारांचे असलेले प्रलंबित प्रश्न रोहिदास मुंडे यांच्या मार्फत महापालिकेत उठवले जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे सफाई कामगारांचे मागील थकीत भत्ते, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामगार भरती यासाठी ही संघटना काम करीत आहे.तसेच दिवा शहर अध्यक्ष पदी संजय जाधव तर कार्याध्यक्ष पदी अनिकेत सावंत यांनी निवड करण्यात आली यावेळी भारत गायकवाड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,बाळ हरदास कार्याध्यक्ष, शांताराम शेलार उपाध्यक्ष, राज मालपाणी अध्यक्ष औद्योगिक कामगार विकास महाराष्ट्र, कल्पेश नरसिंगे सचिव औद्योगिक कामगार विभाग महाराष्ट्र, रितेश जाधव अध्यक्ष वैद्यकीय आरोग्य कर्मचारी विभाग महाराष्ट्र राज्य, शकील खान अध्यक्ष ठाणे जिल्हा, अशोक गवळी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा, संतोष खामकर संघटक ठाणे जिल्हा,नागेश पवार,विकास इंगळे,योगेश निकम यांच्या उपस्थितीत पद नियुक्ती करण्यात आली.
जाहिरात
जाहिरात