दिवा बेडेकर इंग्लिश स्कूल येथे लाखो लिटर पाण्याची नासाडी ; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष :- रोहिदास मुंडे यांचा आरोप

Spread the love

दिवा:-दिवा शहरातील रिमॉडलिंग नागरिकांना योग्य पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने की २२१ करोड रुपये खर्चून रिमॉडलिंग म्हणजेच पाण्याचे नवीन पाईप लाईन्स घाईघाईने (अनियोजीत पद्धतीने) टाकण्यात आल्या ? कारण त्या कामाचे उदघाटन मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते करायचे होते…!ठरल्या प्रमाणे त्यांच्या हस्ते त्या कामाचे उदघाटनही करण्यात आले, जवळ जवळ ४२ ते ४४ MLD पाणी दिवेकरांसाठी असतानाही मग आजही दिवा शहरातील अर्ध्या अधिक भागात पाणी पुरवठा सुरळीत का नाही ?
म्हणजेच सत्ताधाऱ्यांचा नियोजन शून्य मनमानी कारभारच..
उद्घाटनाच्या एक दिवसा अगोदर करण्यात आलेल्या नवीन पाईप लाईन च्या टेस्टिंग दरम्यान या पाण्याच्या लाईन्स दिवा-आगासन रोड वरील विकास म्हात्रे गेट समोर मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले व नेटकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना लाखोली वाहिली तेव्हा रातोरात नवीन बनवलेल्या रस्त्याची तोडफोड करत युद्धपातळीवर पाईप लाईन दुरुस्त करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले

व्हिडिओ पहा सविस्तर


पुन्हा एकदा दिवा शहरात आगासन गेट जवळ पुन्हा प्रयत्न फसला… आणि आगासन रेल्वे फाटक जवळ पुन्हा एकदा पाण्याच्या लाईनी फुटल्या आणि काँक्रेट रस्त्याच्या आतून डिव्हायडर मधून पाणी बाहेर येऊ लागले म्हणजे यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी ही झालीच पाहिजे टक्केवारीच्या नादात दिव्याचा विकास होत नाही सत्ताधारी विकासाच्या नावाने बोंबा मारत असले तरी यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला हे आम्ही वारंवार निदर्शनास महापालिकेच्या हाणून दिलेले परंतु ठाणे महापालिकेने दिव्यात होणाऱ्या विकास कामाबद्दल डोळ्यावरती पट्टी बांधलेली असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आज आज बेडेकर नगर येथे बेडेकर इंग्लिश स्कूलचे येथे मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज होऊन रस्त्यावरती पाणी साचलेले परंतु महापालिकेच्या पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष असून एकीकडे नागरिक पाण्यापासून वंचित असताना लाखो लिटर पाणी वाया जात आहे .तरी याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page