कोलाड ( श्याम लोखंडे ) :
पावसाळा सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर कोलाड आंबेवाडी चौकातील उड्डाण पुल बनविण्यासाठी प्रशासनाला आली जाग,यासाठी खोदाईचे काम युद्ध पातळीवर सूरू तर वाहन चालकांची एकच तारेवरची कसरत होत असताना दिसत आहे. मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड आंबेवाडी नाका येथील मेन चौकात उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यासाठी मेन रस्ता बंद करण्यात आला असुन पावसाळा सुरु होण्याच्या काही दिवस शिल्लक राहिल्याच्या अगोदर उड्डाण पुल बनविण्यासाठी प्रशासनाला जाग आली आहे व ही वाहतूक दोन्ही बाजूला कमकुवत असणाऱ्या सर्व्हिस रोड वरुन वळवण्यात आली आहे.परंतु या दोन्ही बाजूचे रस्ते एवढे कमकुवत असल्याने ते खचले आहेत तर खचलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह या मार्गानी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची तारांबळ होत असून जिवाला धोका निर्माण झाला आहे.
पावसाळा संपल्यानंतर पाच महिन्यात आंबेवाडी नाका येथील उड्डाण पुलाचे काम सुरु केले नाही.परंतु दुसरा पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवस राहिले असून आंबेवाडी नाक्यावरील मेन रस्ता बंद करुन उड्डाण काम सुरु करण्यात आले. परंतु या अगोदर सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम हे सिमेंट काँक्रेटने पक्के केले पाहिजे होते परंतु ते राहिले दूरच हा निस्कृष्ठ दर्जाचा असणाऱ्या रस्त्यावरुन वाहतूक वळविण्यात आल्यामुळे आत्ताच रस्ता खचला असून पाऊस नंतर या रस्त्याची काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही.?
मुंबई-गोवा हायवे वरील चौपदरीकरणाच्या कामाला १६ वर्षे पुर्ण झाली असुन या कामात कोणतेही प्रगती नाही. प्रशासनाचा बेजबाबदारपणा व ठेकेदारांचा मनमानी कारभार यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु या कामासाठी लागणारी जागा उपलब्ध करण्यासाठी येथील किराणा मालाचे व्यापारी,हॉटेल,पान टपरी,कापड व्यावसायिक, तसेच इतर व्यावसायिक यांना कोणतेही सवड न देता त्याच्या दुकानावर बुलडोजर फिरावण्यात आला. काही दुकानातील सामान ही काढून दिला नाही.
आंबेवाडी नाका हे बाजारपेठेचे मध्यस्थी ठिकाण असुन येथून मुंबई गोवा तसेच पुणे,रोहा,मुरुड,अलिबाग कडे जाण्यासाठी प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते ही वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरु केल्यानंतर कै द. ग. चौकात असणाऱ्या गटारावर मोठा खड्डा पडला असून यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोलाड आंबेवाडी बाजापेठेत थोडा पाऊस पडला तरी पुराची परिस्थिती निर्माण होते. याला कारण दोन्ही बाजूला बनवले गटार हे उंचावर व रस्ता खाली असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही.यात भरीत भर म्हणून गोदी नदीजवळील गटाराचे काम अर्धवट स्थितीत असुन यामुळे पाण्याचा निचरा होत नाही याला कारण निद्रअवस्थेत असलेला प्रशासन व प्रशासनाचा ठेकेदारावर नसलेला वचक यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले तरी रस्त्याचे काम पुर्ण होत नाही परंतु खचलेल्या रस्त्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.