▪️ गोळप कट्टाच्या ३९ व्या कार्यक्रमात रत्नागिरीतील परांजपे काजू कंपनीचे मालक ऋषिकेश परांजपे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
▪️ श्री. परांजपे म्हणाले आमचे मूळ गाव आडिवरे. माझे आजोबा कै. अनंत परांजपे हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना सात भाषा लिहिता बोलता येत होत्या. त्यांना ताम्रपट मिळालेला आहे. वडील काहीतरी कमविण्यासाठी म्हणून मुंबईला गेले. मुंबईत खूप कष्ट केले. असेल त्या परिस्थितीमध्ये समाधानी रहायचे ही मोठी शिकवण बाबांनी दिली. आम्ही डोंबिवलीत राहत होतो. तिसरीत असताना आजूबाजूच्या घरात फिरून कालनिर्णय विकली आणि त्याचे पैसे मिळाले. हा आयुष्यातील पहिला उद्योग होता. त्यानंतर दहावीच्या सुटीत वडिलांची नाराजी पत्करून एका कॉम्प्युटर विक्री करणाऱ्या दुकानात नोकरी केली. प्रामाणिक कामामुळे फ्लॉपी, पार्ट खरेदीचे काम करायला मिळाले. त्यात आनंद वाटू लागला. पार्टची माहिती आणि बार्गेनिंग शिकायला मिळाले. कॉलेज मध्ये असताना मित्राला कॉम्प्युटर पार्ट आणून जोडून दिला. त्यात चांगले पैसे मिळाले. नंतर कॉलेज सुरू असताना सुमारे १०० कॉम्प्युटर विकले. दरम्यानच्या काळात मुंबईत कामगारांचा संप झाला. त्यावेळी कामगारांची स्थिती लक्षात आली. मनावर बिंबली. तेव्हा ठरवले भविष्यात आपण काही उद्योग केला तर कामगार समाधानी पाहिजे.
▪️ बी.कॉम. नंतर एका चार्टर्ड अकाऊंटंटकडे काम केले. तिथे प्रचंड शिस्त आणि खूप काही शिकायला मिळाले. नंतर एम.बी.ए. केलं. एका खाजगी कंपनीमध्ये आता पत्नी आणि तेव्हा मैत्रीण असलेली समृद्धी हिला इंटरव्ह्यूसाठी सोडायला गेलो होतो. तिथे कळलं की फिरतीचा जॉब आहे त्यामुळे तिने नाही म्हटले. पण मला अॅप्लाय करायचा सल्ला दिला. मी तिथेच एका दुकानात बायोडाटा बनवून त्यांना दिला. कॉम्प्युटर नॉलेज मुळे सिलेक्ट पण झालो. पहिली नोकरी लागली. नंतर टी.सी.एस. कंपनीत नोकरी लागली. त्यामुळे ठरलेले असल्याने लग्न केले. दोन महिन्यात कॅनडाला जायची संधी मिळाली. तिथे प्रथम काजू पाहिला. भविष्यात काजू आपण परदेशात विकायचे डोक्यात आले. त्या कंपनीत प्रमोशन टप्प्याने होत असल्याने पटणी कॉम्प्युटर ही कंपनी जॉईन केली. मॅनेजर पदावर असताना लक्षात आलं की कंपन्या गरज संपली की कधीही काढू शकतात. त्यातच बहिणीचे यजमान म्हणाले तू गावाला कारखाना काढत का नाहीस? सरकार अनुदान देईल. डोक्यात विचार होताच, लाखोंचे पॅकेज सोडून गावाला आलो. पत्नीचे मोठे धाडस. निव्वळ तिच्या साथीमुळे शक्य झाले. प्रोसेसिंग साठी आंबा काजू आणि कोकम यापैकी काजू निश्चित केले.
▪️ महाराष्ट्रात, गोव्यात, मंगलोरमध्ये अनेक काजू कंपन्यांना भेट दिली. काही ठिकाणी एम.बी.ए. विद्यार्थी सांगून माहिती मिळवण्यासाठी फुकट काम केले. अखेर सन २०१० मध्ये आडिवरे येथे दिवसाला एक टन क्षमतेचा काजू कारखाना सुरू केला. लायसेन्ससाठी तसेच बँकेबाबत अनंत अडचणी आल्या. नंतर आडिवरे येथील कारखाना कमी पडू लागला. अत्याधुनिक मशिनरी आणायची तर लाईटचा ५० एच.पी. सप्लाय हवा होता. तो तिथे लगेच उपलब्ध नसल्याने रत्नागिरी एम.आय.डी.सी. येथे जागा बघायला सुरुवात केली. योगायोगाने ‘उगार’ कंपनीची जागा विकायची होती. जागा खूप मोठी मात्र किंमत पण प्रचंड होती. माझे सगळे पैसे शिवाय मित्रांची मदत यामुळे ती काही कोटींची जागा घेता आली. सन २०१४ ला तिथे दिवसाला दहा टन क्षमतेचा कारखाना सुरू झाला. आज ३२ प्रकारचे आणि ७ चवींचे काजू बनवतो. त्याच बरोबर टरफलांपासून तेल बनवायचा रत्नागिरीतील पहिला कारखाना सुरू केला. २०१९ ला १६ टन काजूगर कंटेनरमधून अमेरिकेत एक्स्पोर्ट करून महाराष्ट्रातील पहिली काजूगर एक्स्पोर्ट कंपनी बनण्याचा मान मिळवला. आज शंभर कामगार तिथे काम करतात. त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासाठी आवश्यक त्या हिताच्या गोष्टी करतो. प्रचंड कष्ट केले. खूप अडचणी आल्या. मात्र माझी आवड असल्याने सगळ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘काजूगर कारखाना’ आणि ‘काजूगर एक्स्पोर्ट’ हे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण झाले. ‘टीव्हीवर काजूगर जाहिरात’ हे स्वप्न पूर्ण व्हायचे आहे कारण पुरवठा करण्यासाठी प्रचंड उत्पादन क्षमता वाढवावी लागेल. मी किती यशस्वी हे लोक आणि काळ ठरवेल. मी आशावादी आहे. मी अजूनही झगडतो आहे आणि उत्तम यश मिळेल असा मला विश्वास आहे. अनंत अडचणी असूनही आयुष्यात शब्द पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. कोणत्याही उद्योगाला समाजाने पाठींबा दिला पाहिजे आणि त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. तरच उद्योजक वाढतील. तरुणांनी उद्योजक बनायला हवे. याशिवाय त्यांनी व्यवसायातील, दलालांचे, शासकीय व्यवस्थेतील प्रचंड अनुभव आणि किस्से सांगितले.
गोळप कट्टा कार्यक्रमात ऋषिकेश परांजपे यांनी उलगडला आपला जीवनप्रवास