*ठाणे मुरबाड प्रतिनिधी-(लक्ष्मण पवार) –* गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक , शैक्षणिक , कला, क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारे मुरबाड तालुक्यातील खंदारे या गावचे दिवंगत गणपत उघडे यांचे चिरंजीव आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून रिपाई आठवले पक्षाची मुरबाड तालुका अध्यक्ष पदाची धुरा ते सांभाळत असताना समाजातील गोरगरीब, कष्टकरी विद्यार्थी वर्ग, नोकरदार ,शेतकरी महिलावर्ग यांना नेहमीच मोलाचे सहकार्य करून ते प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून येतात. दिवंगत वडील (पो.पा.) गणपत उघडे यांची त्यांना चांगली शिकवण व संस्कार लाभल्याने दिनेशराव उघडे समाजसेवेचे व्रत जपत आहेत.
दिनेश उघडे यांचे वडील मुरबाड तालुक्यातील खांदारे गावचे आदर्श पोलीस पाटील म्हणून तालुक्यात त्यांचे पोलीस पाटलांमध्ये नाव आहे. आपल्या गावामध्ये तंटा होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीत गावाला एक संघ ठेवण्याचे काम त्यांनी केले, समाजातील विविध जाती धर्मातील लोकांना एकत्र ठेवण्याचे काम सामाजिक भावनेतून त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले . त्याचाच वसा घेत आज दिनेश उघडे आपल्या वडिलांच्या
*मरणोत्तर…पाटीलकीचा सन्मान*..
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रत्नांचा सन्मान करणे हे माझ्या वडिलांचे स्वप्न आहे त्यांच्याच सामाजिक कार्याचा वसा घेत मी हे कार्य अविरत चालू ठेवणार आहे असे व्यासपीठावरून रिपाई अध्यक्ष दिनेश उघडे आपल्या मनोगतातून बोलत होते.
यावेळी मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार यांनी दिनेश उघडे यांच्या पाठीवर थाप मारून जात ,धर्म ,पक्ष ,गट नाही तर मला माणूस आवडतो म्हणून महाराष्ट्रातील पहिला असा एक रिपाई आठवले पक्षाचा मुरबाड तालुका अध्यक्ष आहे की तो सर्व समाजाला एकत्र करून सामाजिक भावनेतून नर रत्नांचा सन्मान करतो म्हणून महाराष्ट्रात असा अध्यक्ष होणे नाही तसेच त्याचे राजकीय भविष्य उज्वल आहे. असे उद्गार व्यासपीठावरून मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी काढले. यावेळी दिनेश उघडे यांनी आयोजित केलेल्या विशेष पोलीस पाटील, वकील ,जेष्ठ नागरिक ,युवा कलाकार, नारीशक्ती सन्मान, पत्रकार सन्मान पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे, रिपाई महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश दादा बार्शिंगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महबूब भाई पैठणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीशजी शिंदे, मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोदजी बाबर शिवव्याख्याते रोशन पाटील, एडवोकेट सचिन चौधरी ,भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीनजी मोहपे, सुरेशजी बांगर सर , अनिल घरत, मुरबाड पंचायत समिती माजी सभापती दीपकजी पवार , रिपाई ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अनिलजी धनगर, ठाणे जिल्हा सरचिटणीस भगवानजी भालेराव, माजी नगरसेवक रवींद्र देसले, रिपाई मुरबाड तालुका उपाध्यक्ष रमेश देसले , बहुजन विद्यार्थी परिषद अध्यक्ष संतोषजी उघडे महिला अध्यक्षा सुरेखा ताई खोलाबे ,भाजपा युवा कार्यकर्ते नरेश मोरे इत्यादी कार्यकर्ते नेते मंडळी यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.