
जनशक्तीचा दबाव दिनेश आंब्रेसोशल मीडियावर आधारित नृत्य लक्षवेधक ठरले आहेत. सर्वात लक्ष वेधून भुताचा डान्स या गाण्याने घेतले आहे. प्रेक्षकांमधून सदर कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांची दाद मिळवून दिला आहे.
कबड्डी डान्स ठरला आकर्षक ठरला आहे.विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव, कबड्डीचा प्रभाव, तसेच विविध लोक नृत्य,बेटी बचाव बेटी पढाव अभियानावर आधारित नृत्य उत्कृष्ट ठरली.


उत्कृष्ट रांगोळ्या व प्रशालेच्या इमारतीला केलेली सजावट, मन वेधून घेणारी विद्युत रोषणाई मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांचे लक्ष वेधून घेणारी होती. प्रशालेला 94 वर्ष पूर्ण होत असताना गेली काही वर्ष प्रशालेतील विविध माजी विद्यार्थी व उद्योजक विविध क्षेत्रात नोकरीला असणारे विद्यार्थी, प्रशासकीय आणि शासकीय अधिकारी, व्यावसायिक व कलाकार आदींनी भेटी देऊन शाळेच्या चढत्या प्रगतीचा आलेख पाहिला.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर मान्यवर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिल शेठ शेट्ये, उपाध्यक्ष श्री किशोर शेठ पाथरे, सेक्रेटरी श्री धनंजय शेटे सर, सदस्य श्री संदीप शेठ सुर्वे श्री. रमेश शेठ झगडे , मुख्याध्यापक सचिन देव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे रत्नागिरीचे उद्योजक विशेष अतिथी श्री.शकील शेठ सावंत, प्रमुख अतिथी श्री.प्रशांत यादव (अध्यक्ष वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट )माजी विद्यार्थी श्री.दिनेश आंब्रे आधी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
माननीय श्री. प्रशांत यादव, उद्योजक शकील सावंत यांनी मनोगते व्यक्त केली.त्यानंतर आर्ट गॅलरी पाहून विद्यार्थ्यांच्या कलेची पाहुण्यांनी प्रशंसा केली. जे.डी. पराडकर कला शिक्षक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना कलेची माहिती दिली.रेकॉर्डं डान्स, लावण्या इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. माजी विद्यार्थि श्री दिनेश आंब्रे यांना समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रशालीच्या वतीने दिलेले अभिनंदन पर पत्र आणि सत्कार केल्याबद्दल त्यांनी व्यापारी पैसा फंड सोसायटीची कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या कला महोत्सव निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिल गजानन शेट्ये, सेक्रेटरी माननीय श्री.धनंजय शेट्ये सर, सदस्य श्री.संदीप सुर्वे,श्री. रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांना “दर्पण व बाल विकासाच्या दृष्टी”इत्यादी पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. माजी विद्यार्थिनी युवा गायिका कुमारी समिक्षा वाडकर हीचा चेअरमन अनिल शेठ शेट्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रशालेच्या शिक्षिका सौ.अर्चिता कोकाटे मॅडम यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेक्षकाने उत्तम प्रतिसाद दिला.
जाहिरात


