उघड्यावर दारु पिणाऱ्यांवर दिवा पोलिसांची कडक कारवाई,सा.जनशक्तीचा दबाव बातमीचा परिणाम

Spread the love

दिवा (प्रतिनिधी) दिवा चौक येथे रात्रंदिवस उघड्यावर आणि टोळीने दारु पिणारे तळीराम आता दिवा पोलिसांच्या रडावर असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.याबाबत दिवा पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शहाजी शेळके यांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान याबाबत जनशक्तीचा दबाव वृत्तपत्राने आनलाईन वृत्त प्रसिद्ध केले होते.त्याचाच इम्पॅक्ट म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे.

दिवा चौका शेजारीच दिवा महोत्सवाचे प्रसिद्ध मैदान आहे.या मैदानातूनच दिव्याच्या सांस्कृतिक पायाभरणीला सुरवात झालेली आहे.या ठिकाणी दरवर्षी नागरिक जमा होऊन दिव्यातील नागरिक परिवासासह येवून आनंदोत्सव साजरा करतात.मात्र या मैदानात तळीराम थेट टोळीने दारु पिण्यास बसून मैदानात बाटल्या टाकतात.काही बाटल्या फुटल्यामुळे नागरिकांच्या पायांनाही इजा झाल्याचे समजत आहे.त्यामुळे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या मैदानातून तळीरामांवर कडक कारवाई करावी अशी ओरड नागरिकांची सुरु होती.

दिवा चौक हा नियमीत गजबजलेला चौक असतो.येथून नागरिक व महिला आपल्या मुलाबाळांसह रात्री अपरात्री प्रवास करीत असतात.त्यामुळे येथून जाणाऱ्या महिलांवर एखाद्या दारुड्यांची नजर पडल्यास त्याचा धोका निर्माण होऊ शकतो.तसेच रात्री 8 नंतर येथून महिला प्रवास करण्यासही घाबरत असतात.त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे दिव्यात येणाऱे बरेच लोक सामान्य कुटूंबातले आहेत.तर दुसरीकडे सामान्य कुटूंबातले असताना त्यांना व्यसनाची सवय लागलेली दिसून येत आहे.काही महिला दारुमुळे वैतागल्या असून येथील दारुची दुकानेच बंद करावी अशी मागणी करत आहेत.त्यामुळे उदवस्त होणारे महिलांचे संसार तरी वाचतील अश्या अपेक्षा व्यक्त करीत आहेत.या नुकसानीची दखल घेवून काल सा.जनशक्तीचा दबाव वृत्तपत्रात मजकूर फोटोसहीत प्रसिद्ध करण्यात आला होता.त्याचाच परिणाम म्हणून दिवा पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे.भविष्यात पोलिसही नवतरुणांना व्यसणापासून रोखू शकतात का? हे पहावे लागणार आहे.किंवा उद्वस्त होणाऱ्या संसारापासून तरी महिलांना वाचवू शकतात का ? हे पहावे लागणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page