
*मुंबई-* बीडमधील मस्सोजगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण चांगलचं तापलं असून या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडे राजीनामा द्या, आता सर्वोच्च आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बड्या नेत्यांची चर्चा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण चांगलचं तापलं असून या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी धनंजय मुंडेंना (Dhanajay Munde) राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील सातत्याने केली जात होती. आता फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना लाथ मारून बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. का, ल रात्री मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रफुल पटेल यांची देवगिरीवर महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये शेवटी राजीनामा द्यावाच लागेल, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असा आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.