अलिबाग :- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज बुधवारी पुन्हा अलिबाग येथील रायगड एसीबी कार्यालयात चौकशी करिता हजर झाले. त्यांची ही पाचव्यांदा चौकशी झाली . दरम्यान, आपल्याला त्रास देण्यासाठी हा सगळा खटाटोप घातला जात आहे. याआधीही चौकशीला सहकार्य केले आहे. कागदपत्रेही दिली आहेत, असे असताना पुन्हा पुन्हा बोलावून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका याआधीच राजन सावळी यांनी केली होती.