चिपळूण :- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी रस्ता खचून धोकादायक बनला होता. परंतु दुसऱ्या लेन वरील खडक तोडण्यासाठी बरेच दिवस गेल्याने दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले होते. मात्र खचलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एकीकडे दरडीची भीती, तर दुसरीकडे खचलेल्या रस्त्याचा धोका निर्माण झाला होता. आता खचलेले काँक्रीटीकरण ब्रेकरने तोडले जात आहे. त्याठिकाणी लवकरच नव्याने काँक्रीटीकरणाचे काम केले जाणार आहे.
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. गत वर्षी परशुराम घाटात ५ ते ६ वेळा दरड कोसळली होती. मोठ्या वळणावर रस्ता खचला असून तेथून जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक सुरु आहे.