
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुक्याच्यावतीने मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार “एक सही संतापाची ” हे अभियान राबवण्यात आले ..सद्यस्थितीतील राजकारणाचा चिखल झाला असून , मतदारांनी दिलेल्या मतदानाशी प्रतारणा सर्वच राजकीय पक्षांनी केली असून सर्वसामान्य माणसाच्या मनातील असंतोषाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण राज्यात मनसे तर्फे राबवण्यात येत असून रत्नागिरी तालुका मनसे अध्यक्ष श्री रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष श्री. अद्वैत कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, शहर संघटक श्री अमोल श्रीनाथ, मनसे महिला शहर अध्यक्ष सौ. अंजलीताई सावंत, श्री. सुनील साळवि, नयन पाटील, चैतन्य शेंडे, सौरभ पाटील, एकनाथ शेटये, जयेश दुधरे, अखिल शाहू,रूपेश चव्हाण, सोम पिलणकर, जयेश फणसेकर, नवनाथ साळवी, अभिलाष पिलणकर , सर्वेश जाधव, आदींसह तालुका व शहरातील मनसे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या अनोख्या स्वाक्षरी कार्यक्रमास रत्नागिरीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जाहिरात
