रत्नागिरी- विविध मागण्यांसाठी आंबा-काजू बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केले.

Spread the love

आंबा, काजू बागायतदारांचे साखळी उपोषण

एकदाही कर्जमाफी नाही ; आंदोलक आक्रम, दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामाचा इशारा..

रत्नागिरी : कोकणातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्यानंतर एकदाही कर्जमाफी किंवा सरसकट नुकसान भरपाई दिलेली नाही. येथील अर्थव्यवस्था या पिकांवर चालते. तरीही येथील आंबा-काजू बागायतदारांची कर्जमुक्ती व सातबारा शासनाने कोरा केलेला नाही. अल्प प्रमाणात रक्कम देऊन आमची बोळवण केली जात आहे; मात्र आता हे सहन करून घेतले जाणार नाही. दुर्लक्ष केले तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात हिवाळी अधिवेशनात शासनाने लक्ष वेधण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बागायतदारांनी साखळी उपोषण छेडले.

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रते सहकारी संस्था मर्यादित संस्थेचे प्रकाश (बावा) साळवी, रामचंद्र मोहिते, दीपक राऊत, टी. एस. घवाळी, मंदार जोशी, जगन्नाथ पाटील यांच्यासह अनेक आंबा बागायतदार यात सामिल झाले होते. गेल्या २०२२-२३ हंगामात फक्त १२ टक्केच आंबा उत्पादन आले. शासनाकडून मदत मिळावी म्हणून आम्ही मागणी केली होती; परंतु आता दुसरा हंगाम आला तरी अजून शासनाने मदत जाहीर केलेली नाही. शासनाने आता प्रत्येक कलमामागे १५ हजार रुपये या प्रमाणे सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.


अशा आहेत मागण्या…

आंबा, काजू बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, सीबील रिपोर्ट अथवा कोणतीही कारणे ठेवू नये. २०१५ चे ३ महिन्याचे व्याज व पुनर्गठनाचे व्याज त्वरित कोणतीही अट न ठेवता खात्यात जमा करावे, महात्मा फुले सन्मान योजनेचे ५० हजार रुपये नियमित परतफेड करणाऱ्यांच्या खात्यात जमा करावे, नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या विम्याची रक्कम खात्यामध्ये त्वरित जमा करावी, मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करणाऱ्या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा, आंब्याच्या वाहतुकीसाठी शेतकरी व बागायतदारांना वाहने घेण्यासाठी अनुदान देण्यात यावे, खते, औषध, रॅपलिंग, विहिर, पंप, फवारणी साहित्यांवरील जीएसटी माफ करावी, बॅंकांकडून होणारी जप्तीची कारवाई त्वरित थांबवावी, शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा सुरू करावी, महावितरणाच्या अन्यायकारक वर्गवारीमुळे बाधित शेतकऱ्यांची वीजबिले दुरुस्त करून मिळावी.

रत्नागिरीचे पालकमंत्री यांच्याकडून पर्यंत आश्वासने ….

आम्ही पालकमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीही अनेकवेळा चर्चा केली. त्यांच्यासोबत या प्रलंबित प्रश्नांवर बैठका झाल्या. नुसती आश्वासने मिळाली; परंतु त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचे शस्त्र उगारावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश साळवी यांनी दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page