पत्रकार शशिकांत वारिशे यांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतण्याचा इशारा

नवी मुंबई (प्रतिनिधी) मंगळवार दि.7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.15 च्या दरम्यान राजापूर-कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव येणाऱ्या पंढरीनाथ आंबेरकर (जमीन दलाल) यांच्या महेंद्र थार या गाडीने दै.महानगरी टाइम्सचे पत्रकार कै.शशिकांत वारिसे यांच्या यांना जोरदार ठोकर दिली.आणि यात पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यु झाला आहे.याप्रकरणी अपघाताची सखोल चौकशी करुन सबंधितांवर कडक कारवाई करावी यासाठी रत्नागिरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी कोकण भवन येथे भेट घेवून पोलिस महानिरिक्षक यांना निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मुळात या अपघाताचे दृश्य पाहता एका मोकळ्या जागी जेथे गाडी पासिंग होण्यास जागा आहे.असे असतानाही समोरा समोर येवून पंढरीनाथ आंबेरकर या इसमाने भरधाव येत ठोकर दिल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे हा अपघात संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
राजापुर तालुक्यात नाणार येथे रिफायनरी प्रकल्प येवू घातलेला आहे.हा प्रकल्प विनाशकारी असल्याने येथील पत्रकार शशिकांत वारिसे हे नियमित आपल्या वर्तमान पत्रातून लोकांचा आवाज उठवत होते.त्यामुळे त्यांनी केलेल्या बातम्यांचा राग मनात ठेवून हा जाणूनबूजुन अपघात केलेला असावा असा संशय त्यांच्या कुटूंबियांसह आता नागरिक करीत आहे.त्यामुळे अश्या खूनशी प्रवृत्ती असलेला गाडी चालक पंढरीनाथ आंबेरकर याला मारण्यासाठी कोणी सुपारी दिली आहे का? त्याने खून करण्यासाठी कित्येक दिवसांपासून पाळत ठेवली आहे का? त्याचे सिसिटीव्ही फुटेज आणि या अपघाताची कारणे शोधावी.या अपघातामागे कोणाचा हात आहे का? किंवा पंढरीनाथ आंबेरकरसह ज्याने हा अपघात घडवून आणला असेल त्याची सखोल चौकशी करावी आणि आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी करीत जर पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर कोकणातील संपुर्ण जनतेला घेवून आम्हाला रस्त्यावर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसेल याबाबत नमुद केले आहे.