व्हॅलेंटाईन डेला जोडीदारासोबत अचानक बाहेर जाण्याचा प्लॅन बनला, तर काही मिनिटांत ‘असे’ व्हा तयार

Spread the love

प्रत्येक जोडप्यासाठी व्हॅलेंटाईन डे खूप खास असतो. ज्यासाठी प्रत्येकजण खूप आधीपासून तयारी सुरू करतो. अनेक जोडप्यांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे भेटता येत नाही. पण, अनेक जोडपी अचानक भेटण्याचा बेत आखतात. अशा वेळी सगळ्यात मोठी अडचण त्या मुलींची असते, ज्यांनी भेटण्याची आधी तयारी केली नसते. या दिवशी आपल्या जोडीदारासमोर चांगले दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, घाईमुळे नीट तयारी करायला वेळ मिळत नाही.

अशा परिस्थितीत आमच्याकडे तुमच्या समस्येवर उपाय आहे. खरं तर, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही काही मिनिटांत तुमच्या डेटसाठी तयार होऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रभावित करू शकता.

१) वापरा होम मेड फेस मास्क

जर तुमच्या पार्टनरने अचानक डेट प्लॅन केला असेल आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला नसेल, तर घरीच फेस मास्क बनवा. हळद, साई आणि मधाच्या मदतीने तुम्ही घरी फेस मास्क तयार करू शकता. हा मास्क १५ मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.

२) डेटच्या आधी करा नैसर्गिक स्क्रब

डेटवर जाण्यापूर्वी काही मिनिटे आधी तुम्ही घरी स्क्रब करू शकता. स्क्रब केल्याने मृत त्वचा निघून जाते. त्यामुळे चेहरा लगेच चमकतो.

३) करा झटपट क्लिन अप

डेटवर जाण्यापूर्वी जर तुम्ही घरी क्लिन अप केले, तर तुमचा चेहरा स्वच्छ दिसेल. तुमचा फुललेला चेहरा पाहून तुमचा पार्टनर प्रभावित होईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page