पनवेलमध्ये बांगलादेशींकडे सापडलेल्या रेशन कार्डची चौकशी सुरू

Spread the love


पोलिसांनी माहिती मागविल्याने पुरवठा विभागाचे धाबे दणाणले; रेशन कार्डवर पुरवठा अधिकाऱ्याची सहीच नाही

पनवेल : पनवेल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून
बांगलादेशी नागरिकाने रेशनिंग कार्ड घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे सामान्य नागरिकाला रेशनिंग कार्ड बनवून मिळत नाही, तर दुसरीकडे बांगलादेशी नागरिकाला रेशनिंग कार्ड बनवून मिळत असल्याने हे देशासाठी
धोकादायक आहे. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी पुरवठा विभागाकडून माहिती मागविल्याने विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे.पनवेल शहर पोलिसांनी सेक्टर आर वन करंजाडे येथून तीन बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी महिन्यात ताब्यात घेतले. अमिनूर रसूल शेख (वय ४१), इबाद अमिनूर शेख आणि कोहिनूर अमीनूर शेख अशी तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून रेशनिंग कार्ड, विद्यार्थ्यांची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती असलेले संचयी नोंदपत्रक, मोबाइल फोन जप्त केले होते.

• कोहिनूर अमिनूर शेख याच्या नावाने रेशनिंग कार्ड सापडले असून, त्यात पत्नी आणि मुला-मुलींची अशी सहा नावे आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये ते बनविले असून, त्यात ५५ हजार उत्पन्न दाखविले आहे. ते बनविण्यासाठी प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, लाईट बिल, तलाठी पंचनामाही दिला आहे. मात्र, ते कोणत्या एजंटकडून बनवून घेतले हे मात्र समजू शकलेले नाही. यापूर्वी चिखले येथे बांगलादेशी नाव बदलून घरजावई झाला होता.
■ रेशन कार्डवर सही करण्याचा अधिकार पुरवठा अधिकारी यांना आहे. मात्र, असेपूर्वी असताना बांगगलादेशीने बनविलेल्या रेशनिंग कार्डवर पुरवठा अधिकाऱ्याने सही केलेली नसून ती एका अव्वल कारकुनाने केली आहे. कार्ड दिल्यानंतर पुरवठा शाखेकडौल रजिस्टरवर सही केली नाही. त्यामुळे रजिस्टरवर ती का केली नाही हे गुल आहे. रेशनिंग कार्ड आणि पुरवठा
शाखेतील रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या कोहिनूर शेख आणि त्याच्या पत्नीच्या वयातदेखील फरक आहे. बाहेरील नागरिक येऊन जर पनवेलमध्ये रेशनिंग कार्ड बनवत असेल तर हे भारत
देशासाठी धोकादायक आहे.
■ यापूर्वीदेखील असे अनेक प्रकारचे रेशन कार्ड बांगलादेशी व
इतर नागरिकांना दिली असतील, अशी शंका या प्रकारावरून व्यक्त केली जात आहे.

रेशन कार्ड संदर्भात पोलिसांनी माहिती मागविली आहे. ती माहिती पोलिसांना देणार आहोत.
प्रदीप कांबळे, पुरवठा अधिकारी, पनवेल.

बेलवली येथील राहू पवार यांच्याकडे ईनामुल मुल्ला
(मनोहर पवार) हा लहानपणापासून काम करीत होता.
त्याचे नाव बदलून त्याचे नाव मनोहर राहू पवार असे ठेवून
तो बेलवली येथील असल्याचे दाखविले. त्यानंतर त्याचे चिखले
येथील एका मुलीसोबत २०१२ मध्ये लग्न लावले होते. त्याला
दोन मुले आहेत. हे प्रकरण २०१९- २० मध्ये उघडकीस आल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page