
संगमेश्वर प्रतिनिधी- संगमेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्याकडे सोपवण्यात आला होता . या तीन महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी कामाच्या शैलीतून तालुक्यात जबरदस्त असा दबदबा निर्माण केला होता. त्यांचा तीन महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संपल्याने त्यांची काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी बदली बदली झाल्याने येथील ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद हे 12 मे 2025 पासून रिक्त होते.
या ठिकाणी राजाराम. एम. चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार हाती घेतला. राजापूर पोलीस ठाणे येथून त्यांची बदली झाली असून गेली दीड वर्ष त्यांनी राजापूर तालुक्यात काम करताना अगदी शहरापासून गाव गल्ली पर्यंत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करत आपला वचक निर्माण करून अशा धंद्याना लगाम घातले होते.पोलीस खात्यात त्यांच्या सुमारे वीस वर्षाचा अनुभव असल्याने ज्या -ज्या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे त्या ठिकाणी अवैध धंद्याना लगाम घालणे, गुन्हेगारी वृत्तीला मोडीत काढणे,प्रलंबीत तसेच नवीन गुन्ह्यांचा उलगडा करणे याला प्राधान्य देणे हे त्यांचे कर्तव्य असल्याने त्यांचा त्या-त्या ठिकाणी चांगलाच दरारा होता.
पोलीस निरीक्षक राजाराम. एम. चव्हाण यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील असून 2006 साली ते पोलीस उपनिरीक्षक म्हणुन पोलीस खात्यात रुजू झाले.मुंबई येथून त्यांनी पोलीस सेवेला सुरुवात करताना त्यांनी मुंबई मुख्यालय, पुणे, जळगांव, सांगली, सिंधुदुर्ग या ठिकाणी पोलीस उप निरीक्षक, सहाय्य्क पोलीस निरीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग सहाय्य्क पोलीस निरीक्षक तसेच नवदल सेने मध्ये त्यांनी सेवा बजावली असून 2019 साली त्यांची पोलीस निरीक्षकपदी बढती हाऊन मुबंई येथे सेवा केली तेथून सिंधुदुर्ग व तेथून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाण्याचा कारभार गेले दीड वर्ष सांभाळला आता त्यांची संगमेश्वर पोलीस ठाण्यात बदली झाली असून येथील ठाण्याचा कारभार त्यांनी आपल्या हाती घेतला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे – नूतन पोलीस निरीक्षक राजाराम.एम. चव्हाण
नूतन पोलीस निरीक्षक यांची संगमेश्वर व कार्यक्षेत्रतील प्रतिष्ठित, सामाजिक, राजकीय, व्यकीनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलें. सहकारी पोलीस तसेच जनतेचे सहकार्य आणि त्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक कार्य करणार असल्याचे सांगताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन नूतन पोलीस निरीक्षक राजाराम.एम. चव्हाण यांनी केले आहे.