
ओडिशा – ओडिशात बालासोरमध्ये तीन ट्रेन्सचा अपघात झाला. ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २६१ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?
ओडिशातील बालासोर जवळ ट्रेन अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ह्या दुर्घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. ह्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.