राईन पाडा हत्याकांड ऍड उज्वल निकम यांच्या प्रयत्नाना यश ; नागपंथी डवरी समाजाकडून सत्कार

Spread the love

डिजिटल दबाव वृत्त

मुंबई – मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेतून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच भिक्षुकांना बेदमपणे मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणात आज सत्र न्यायाधीश एफ. ए. एम ख्वाजा यांनी सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली . माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात १ जुलै २०१८ रोजी घडली होती.

सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांनी ३० हून अधिक साक्षीदार तपासले, पाच साक्षीदार फितूर या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी केला यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश एफ.ए.एम ख्वाजा यांच्या समोर चालले. तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ऍड निकम यांनी ३० हून अधिक साक्षीदार तपासले. यातील पाच साक्षीदार फितूर झाले होते. तर महत्त्वाच्या काही साक्षीदारांनी आरोपींनाच ओळखले नव्हते. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे आणि अन्य आधारावर ऍड उज्वल निकम यांनी प्रभावीपणे न्यायालयात पुरावे मांडले तसेच परिवाराचा आधार असून न्यायालयाने सहानुभूती दाखवावी, असे स्पष्ट केल्यानंतर न्यायाधीश ख्वाजा यांनी निकाल जाहीर केला. यात सर्व सात आरोपींना खुनाच्या कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. तर उर्वरित कलमात एक वर्ष ते दहा वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्या.

सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांच्या अथांग प्रयत्नानंतर
राईनपाडा हत्याकांडाचा निकाल तब्बल सहा वर्षानंतर लागला. त्या अनुषंगाने आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवनाथ शिंदे साहेब व नागपंथी,डवरी समाज तसेच गोसावीचे युवा तडफदार नेते विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे पत्रकार विकास जगताप नरेश जगताप सुरेश शिंदे कल्याण सामाजिक कार्यकर्ते नाथपंथी डवरी गोसावी तसेच समाजातील समाज बांधव व भगिनी यावेळी उपस्थित होते.

काय आहे हे नेमके प्रकरण जाणून घेवूया!!

मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी असणारे दादाराव शंकरराव भोसले ( वय ४७ ), भारत शंकर भोसले (वय ४५), राजू मामा उर्फ श्रीमंत भोसले (वय ४५), भारत शंकर माळवे (वय ४५) सर्व राहणार खवे, तालुका मंगळवेढा व अगनू श्रीमंत इंगोले (वय २२) राहणार मानेवाडी हे भिक्षुक साक्री तालुक्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यामुळे हे सर्व पाच परिवार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नजीक एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माळाराणावर साडीचा तंबू करून राहत होते. ग्रामीण भागामध्ये भविष्य सांगण्याच्या नावाखाली हे आपल्या उदरनिर्वाहाचे काम करीत होते. दिनांक १ जुलै २०१८ रोजी
हे पाचही जण साक्री तालुक्यातील काकरपाडा आणि राईनपाडा या गावात जाण्यासाठी निघाले. दोन दिवसानंतर त्यांचा मुक्काम
पिंपळनेर येथून हलणार होता. यानंतर ते त्यांच्या मूळ गावी जाणार होते. मात्र ही शेवटची वेळ आहे असे त्यांच्या परिवाराला सांगून ते निघाले. मात्र काळाच्या उदरात वेगळेच दडलेले होते. साक्री तालुक्यातील राईनपाडा परिसरात गेल्या आठवड्यापासून तालुक्यात मुले पळवणारी टोळी आली असून ते किडनी विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची अफवा पसरली होती. त्यातच हे पाचही भिक्षुक राईनपाडा गावात पोहोचले. यावेळी गावात बाजार असल्यामुळे मोठी गर्दी होती. या गर्दीमध्ये हे भिक्षुक वेगळे असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही तरुणांनी त्यांना हटकले. विशेषता त्यांच्यावर मुले पळवणारी टोळी असल्याचा आरोप करीत त्यांना मारहाण करीत राईनपाडा येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी त्यांना काठ्या आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात
आली. यावेळी भांडण सोडवण्याऐवजी भावना शून्य असलेल्या
अनेकांनी त्यांना मारहाण करीत असल्याचे चित्रण आपल्या मोबाईल मध्ये केले. मदतीच्या आर्त किंकाळ्या मारणाऱ्या या सर्व भिक्षुकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे काही क्षणातच या पाचही जणांचा मृत्यू झाला. विशेषता मदतीसाठी पोहोचलेल्या पिंपळनेर पोलिसांना देखील जमावाने गावामध्ये शिरू दिले नाही. त्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक रामकुमार यांच्यासह उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे आणि पोलीस दल हे बळाचा वापर करून राईनपाडा गावात पोहोचले. यावेळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रक्तमासाचा चिखल पाहून प्रत्येकाला गहिवरून आले. पाचही मयत भिक्षुकांना पिंपळनेर
येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. या दरम्यान त्यांच्या परिवाराला देखील ही माहिती मिळाल्याने रुग्णालयाच्या आवारात झालेला आक्रोश पाहून तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाची डोळे पाणावले. मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल
रेखावार तसेच नाशिक विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजें यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या समोर देखील मोठा पेच निर्माण झाला. अखेर भिक्षुकांना बेदम मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्याने या व्हिडिओ आणि फोटोच्या आधारावर जमावाच्या विरोधात भादवी कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८,१४९,३३६,,३६४, १४१,३४१, ३४२
, ३५३, ४२७, ५०६, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अशा
वेगवेगळ्या कलमाअन्वये गुन्हा दाखल झाला. यातील काही जणांची धरपकड करण्यात आली. त्यानंतर भिक्षुकांचे मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page