
रत्नागिरी- काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील जॅकवेल कोसळून यंत्रणा निकामी झाल्याने रत्नागिरी शहरावर पाणीसंकट कोसळले आहे. या जॅकवेल च्या दुरावस्थेबाबत कल्पना अधिकारी व सत्ताधाऱ्यांना व नगरपरिषदेतील माजी लोकप्रतिनिधींना नव्हती का?
याला सर्वस्वी जवाबदार हे नगरपरिषदेचे अधिकारी तसेच सातत्याने सत्तेत असणारे सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत अशी टिका मनसेचे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी केली आहे, गेल्या काही वर्षात करोडो रुपये खर्च करून रत्नागिरीचा पाणीप्रश्न अजूनही का सतावत आहे? अजून किती वर्ष त्याच त्याच मूलभूत समस्यांसाठी झगडायचे आहे?
या त्रासाबद्दल नागरिकांनी आवाज उठवावा व येणाऱ्या निवडणूकीत मतदान करताना नक्की विचार करावा असे आवाहन त्यांनी रत्नागिरीतील जनतेला केले आहे.