चिपळूण: सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी ही उपक्रमशील शाळा आहे. यावर्षी शाळेला ३० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने शाळेची माहिती देणारी २०२४ ची वैशिष्टयपूर्ण दिनदर्शिका तयार तयार केली आहे. याचे प्रकाशन सहयाद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार मा. श्री. शेखरजी निकम साहेब यांच्या शुभहस्ते हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक प्राधिकरण सदस्य व चिंचघरीचे उपसरपंच डॉ. श्री. राकेश चाळके, चिपळूण पंचायत समिती सदस्य श्री. बाबूशेठ साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पालकांना यावेळी दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. आमदार मा. श्री. शेखरजी निकम साहेब यांनी शाळेच्या दिनदर्शिका उपक्रमाचे व शाळेच्या संपूर्ण कामगिरीचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षिका सौ. मनिषा कांबळी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षिका सौ. मनिषा कांबळी, सौ. रश्मी राजेशिर्के, श्री. संदेश सावंत, सौ.अपूर्वा शिंदे, सौ. विनया नटे, श्रीम. वृषाली राणे, श्रीम. अर्चना देशमुख, सौ. रूपाली खरात, श्रीम. ज्योती चाळके, श्रीम. वर्षा सकपाळ, सौ. शितल पाटील, सौ. माधुरी खताळ, सौ. स्वरा भुरण तसेच सौ. विजया मौजे, श्री. समीर इंगावले श्री. विनोद उदेग, श्री. एकनाथ चाळके, सौ. तांबिटकर यांनी या कार्यासाठी विशेष मेहनत घेतली.