ठाणे ; निलेश घाग ठाणे महानगरपालिकेने आगासन गावातील ३० वर्षांपुर्वीच्या घरांवर तसेच खाजगी मालकीच्या ३५ एकर जागांवर आरक्षण टाकलेले आहे. सदर आरक्षणाच्या विरोधात आगासन ग्रामस्थांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आणि अस्तित्वासाठी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला मनसे दिवा शहर कडून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. कुठल्याही सुविधा नव्याने निर्माण करत असताना समाजातील कुठल्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. दिवा शहरासाठी लागणाऱ्या सुविधा देणे हे जरी गरजेचे असले तरी हे करत असताना जोर जबरदस्ती करून ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करण्याऐवजी त्यांच्याशी योग्य सुसंवाद साधून आणि त्यांना योग्य तो मोबदला देऊन जमिनी संपादीत करणे गरजेचे आहे.
कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांवर अन्याय करून जमिनी संपादीत करण्यास आमचा विरोध असून जर ही जागा मिळत नसल्यास प्रशासनाने इतर पर्यायांचा विचार करायला हवा असे आमचे स्पष्ट मत आहे.
श्री.तुषार भास्कर पाटील दिवा शहर अध्यक्ष – मनसे
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात