
करन अर्जुन आयेंगे, पाणी वही निकालेंगे..

आयुक्त साहेब आय लव्ह यु….नगरसेवक साहेब आय लव्ह यु….ह्या घोषणानी म्हसोबा नगर दुमदुमला
दिवा ; दिवा म्हसोबा नगर येथील नागरिकांनी दि.१९-६-२३ रोजी दिवा प्रभाग समिती सहाय्यक साहेबांना आ.क्र.१५२७,१५२८,१५२९,१५३० प्रमाणे कमलाकर स्मृती बिल्डिंग, नाना मात्रे चाळ ,एकनाथ धाम बिल्डिंग, एकविरा आई चाळ या सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. तरी देखील दिवा प्रभाग समिती आयुक्त यांच्याकडून कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.त्यानंतर पावसाला सुरूवात झाली आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले,अनेकांचे प्रचंड नुकसान झाले.नागरिक,विद्यार्थी जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढत होते.गेल्या शुक्रवारी पाणी जास्त भरल्या नंतर नागरिकांनी रविवारी आंदोलन करण्याचे ठरवले तेव्हा कामाला सुरुवात केली. दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. ३दिवसात काम पूर्ण होईल असे नागरिकांना सांगण्यात आले.अर्धा रस्ता बनवण्यात आला परंतु ९ दिवस झाले तरी परिस्थिती जैसे होती.नागरिकांनी जगायचे कसे,नागरिकांच्या घरात पाणी जाणे बंद झाले पाहिजे,रस्ता व्यवस्थित करून तेथील पाणी जाण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे,रस्त्यावर पथ दिवे चालू केले पाहिजे.नागरिकांच्या जीवाचा प्रश्न तत्काळ सोडवण्यात यावा.यासाठी नागरिकांच्या वतीने दिवा म्हसोबा नगर येथे आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.शेवटी दिवा शहराचे पो.नि.श्री.शहाजी शेळके यांनी स्वतः संपूर्ण परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेवून सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांच्याशी चर्चा करून उद्याच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.पो.नि शहाजी शेळके यांनी केलेल्या मध्यस्थी मुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.

सदर आंदोलनात अनेक नागरिक,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रामपाल मोरया,ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती पाटील,मयु राजापकर,विनोद कदम,नितीन आवाडे,धनाजी पोवार,रिपब्लिकन पार्टी दीपक भाऊ निकाळजे गटाचे दिवा शहर अध्यक्ष दिनेश जाधव त्यांचे सहकारी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले होते.
पहा सविस्तर काय म्हणाले
जाहिरात
