रत्नागिरी/ प्रतिनिधी- फुणगूस मधील ग्रामसेवक अशोक तानाजी भुते याचा मनमानी कारभार विरोधात प्रीतम दीपक भोसले व कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचे पत्र देऊ नये सदा पत्र व्यवहारही पंचायत समिती देवरुख किंवा ग्रामपंचायत फुणगूस यांच्याकडून साधा पत्र व्यवहारी करण्यात आलेला नाही. ग्रामपंचायत अधिनियम मध्ये अनधिकृत घराला अनधिकृत शेरा ठेवणे हे बंधन करत आहे. ग्रामसेवकाला कायद्यातील तरतुदी समजून सांगूनही कुठेही कारवाई करण्यात आलेली नाही. पंचायत समिती देवरुख यांनी सदरचे घर अनधिकृत आहे असे लेखी पत्र दिले आहे. परंतु असेसमेंट वर शेरा देण्यात आलेला नाही. गटविकास अधिकारी देवरुख यांना भेटल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पत्र दिले होते शहानिशा करून असेसमेंट वर अनधिकृत शेरा देण्याचे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले होते. परंतु ग्रामसेवक चुकीच्या पद्धतीने वागत आहे सरपंच व गटविकास अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने माहिती देत आहे. जर असिस्टमेंट वर अनधिकृत शेरा देता येत नसेल तर तो का देण्यात येत नाही याची कायदेशीर माहिती देणे बंधनकारक आहे परंतु ग्रामसेवकाला ग्रामपंचायत अधिनियमातल्या तरतुदी व त्याचे कर्तव्य हेच माहीत नसल्यामुळे सदरचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ग्रामसेवक उमटगिरी करू सून त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत परंतु गटविकास अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही शेवटी नाईलाज असतो मला आमरण उपोषणाला बसायला लागले आहे असे प्रीतम भोसले यांनी सांगितले. मला व माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही गटविकास अधिकारी चौगुले साहेब व सरपंच ग्रामसेवक यांची असेल असे आज माझे म्हणणे आहे व त्यावर मी ठाम आहे असे त्यांनी सांगितले.