
संगमेश्वर प्रतिनिधी – महावितरण चे श्री. एस. एस कदम* .(प्रधान तंत्रज्ञ) यांचा शाखा कार्यालय कसबा येथे सेवानिवृत्ती सोहळा कार्यक्रम श्री. छत्रपती संभाजी विद्यालय संगमेश्वर नं .१ येथे मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद शाखा प्रमुख श्री. गोरे यांनी भूषविले.
कसबा ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच कु. पूजा लाने , ग्रामपंचायत कर्मचारी धर्मचंद्र तांबे, कसबा बौद्धवाडी चे सभासद रूपेश तांबे. माजी कर्मचारी सुरेश तांबे यांचे सुपुत्र महेश तांबे ,दिलीप कांबळे स्नेही ( एस. टी. महामंडळ माजी कर्मचारी. ) , कदम मेस्त्री याचे सहकुटुंब व कार्यालयातील सर्व कर्मचारी या सोहळ्याला हजर होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम सर्वांचे स्वागत करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक तांबे व महेश तांबे यांनी केले.. त्यानंतर सर्वांनी मनोगत व्यक्त केले. कदम मेस्त्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले.
शेवट शाखा कार्यालय कसबा कर्मचारी यांकडून एक भेटवस्तू , शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. व त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.