शिवसेना-मनसे एकत्र येणार? युतीबाबत ‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं मोठं विधान

Spread the love

मुंबई : शिवसेना (Shiv Sena)-मनसे एकत्र येणार नाही. मुंबई महापालिकेत आमची कोणासोबत युती होईल का नाही हे माहित नाही. मात्र, मनसेनं स्वबळावर निवडणुकीसाठी (Mumbai Municipality) तयारी केली आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाकरे (Amit Thackeray) आज कऱ्हाड दौऱ्यावर होते. त्यादरम्यान त्यांनी विद्यानगर परिसरातील मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, धैर्यशील पाटील, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, राजेंद्र केंजळे, शहराध्यक्ष सागर बर्गे, तालुकाध्यक्ष दादा शिंगण, नितीन महाडिक आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, राजसाहेब ठाकरे यांच्या एवढा महाराष्ट्र फिरलेला नेता मी पाहिलेला नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा एसटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु. मनसे (MNS) वाढीसह विद्यार्थी संघटना बांधणीस महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे. त्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले.

Please wait while flipbook is loading. For more related info, FAQs and issues please refer to DearFlip WordPress Flipbook Plugin Help documentation.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page