“पंतप्रधान नरेंद्र मोदी तपस्वी आहेत, आता आपलंही कर्तव्य आहे की…”; मोहन भागवत यांचं वक्तव्य…

Spread the love

मोहन भागवत यांचं अयोध्येत भाषण, रामलल्लासाठी आपणही व्रतबद्ध झालं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

अयोध्या ,उत्तर प्रदेश- आजच्या दिवसाचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही इतका आहे. आज अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसह भारताचा स्वाभिमान परतला आहे. संपूर्ण जगाला वेदनांपासून मुक्ती देणारा हा उत्सव ठरणार यात शंकाच नाही असं आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देशात आज अयोध्येसारखंच वातावरण आहे. जे आज इथे येऊ शकलेले नाहीत ते राममय झाले आहेत. देशातल्या छोट्या मंदिरांमध्येही उत्सव सुरु आहे असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.

आज झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचं व्रत, उपवास ठेवलं होतं. माझा आणि त्यांचा जुना परिचय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपस्वी आहेतच. ते एकटे तप करत आहेत आपण काय करु? अयोध्येत रामलल्ला आले पण ते बाहेर का गेले? तर अयोध्येत कलह झाला. तो कलह झाला आणि त्यामुळे रामाला वनवास सहन करावा लागला. १४ वर्षांनी जेव्हा ते परतले तेव्हा जगातला कलह संपवलं. आज ज्यांच्या प्रयत्नांमुळे आपण हा सोनेरी दिवस पाहतो आहोत त्यांचा त्याग, परिश्रम यांना कोटी कोटी नमन आहे. कारसेवकांबाबत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आपल्या इतिहासाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. पंतप्रधानांनी जसं व्रत ठेवलं होतं तसं आता जबाबदारी आपलीही आहे. रामराज्य येण्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करावे लागणार आहेत असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. रामराज्याचे सामान्य नागरिकांप्रमाणेच आपण राहिलं पाहिजे. आपल्या भारताचं जयगान करणारे जे आहेत ते आपले भारताचे नागरिक आहेत. आपल्याला कर्तव्य म्हणून आपले वाद-विवाद, कलह, भांडणं करणं हे सगळं सोडून द्यावं लागेल.

रामयुगातले सामान्य नागरिक प्रामाणिक होते, त्यांच्यात अहंकार नव्हता. तसंच धर्माची चार मूल्यं पाळणारे होते. सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चार मूल्यांवर चालणारे होते. आपल्यालाही तसंच वागलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. एकमेकांमध्ये आपल्याला समन्वय ठेवावा लागेल. एकमेकांमध्ये समन्वय ठेवून व्यवहार करणं हे महत्त्वाचं आहे. करुणा म्हणजे सेवा आणि परोपकार. जिथे तुम्हाला वेदना दिसते तिथे जाऊन सेवा करा. दोन हातांनी कमवा आणि समाजाचं देणं लागतो हे विसरु नका. सूचिता म्हणजे पवित्रता, त्यासाठी संयम हवा. आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. इतरांच्या मतांचाही आदर करायला शिका असाही सल्ला मोहन भागवत यांनी दिला आहे. आपली शिस्त कधीही सोडू नका, समाजातली, कौटुंबिक, सामाजिक शिस्त ही खूप आवश्यक आहे. आपल्या देशाला विश्वगुरु करायचं आहे व्रत आपल्याला हाती घ्यायचं आहे. ५०० वर्षे ज्यांनी ज्यांनी राम मंदिरासाठी संघर्ष केला त्यांचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page