लाल किल्ल्यावरील माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला सलग दहाव्यांदा संबोधित करत आहेत. काँग्रेस वगळता इतर पक्षाचे पंतप्रधान म्हणून दहाव्यांदा संबोधन करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आज भाषणाला सुरुवात करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आणि देशासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या सगळ्याच स्वातंत्र्य वीरांना नमन करुन देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच भारत आत्ता आपल्या अमृतकाळात आहे. जगासाठी भारत हा आशेचा किरण ठरतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपण जाणून घेऊ त्यांच्या भाषणातले प्रत्येक महत्त्वाचे अपडेट्स पुढील प्रमाणे आहेत…
रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या तत्त्वावर देश पुढे जातो आहे-मोदी
२०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये जनतेने सरकार फॉर्म केलं त्यामुळे माझ्यात रिफॉर्म करण्याची हिंमत आली. त्यानंतर ब्युरोक्रसीने परफॉर्म केलं. जनता जनादर्नाची साथ लाभली त्यामुळे ट्रान्सफॉर्म होतानाही दिसतो आहे. आपला विचार हा एक हजार वर्षांचा पाया मजबूत करणारा आहे. जलशक्ती मंत्रालय आम्ही तयार केलं. हे मंत्रालय आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पिण्याचं शुद्ध पाणी पोहचवणं, पर्यावरणातल्या घटकांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी काम करतं आहे. आपलं सामर्थ्य जर आपण नाकारलं तर जग कसं काय स्वीकारणार? मत्स्यपालन, पशूपालन, डेअरी यासाठी वेगळी खाती तयार केली. त्या लोकांना न्याय देण्याचं कामही आम्ही सरकार म्हणून करतो आहे. सहकारातून समृद्धीकडे आपल्याला जायचं आहे त्यामुळेच आम्ही सहकार मंत्रालयही स्थापन केलं आहे.
भारतीयांकडे नीरक्षीर विवेक बुद्धी त्यामुळेच त्यांनी पूर्ण बहुमताचं सरकार दिलंं-मोदी
करोना काळानंतर संपूर्ण जग एका वेगळ्या पद्धतीने विचार करु लागलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने एक वेगळा आकार घेतला होता. आता करोना काळानंतर नव्या जिओ पॉलिटिकल इक्वेशनच्या दिशेने जग वळतं आहे. माझ्या कुटुंबीयांना अभिमान वाटेल की तुमचं सामर्थ्य जगाला आकार देतं आहे. आपण सगळेच जण एका निर्णायक ठिकाणावर आहोत. करोना काळात भारताचं सामर्थ्य काय आहे ते जगानं पाहिलं आहे. जगातली अर्थव्यवस्था कोलमडली होती. अनेक महासत्तांवर दबाव होता त्यावेळी आपण देश म्हणून जगाचा विचार केला. जो मानवकेंद्री होता. मानवी संवेदना सर्वात मोठी असते हे कोव्हिडने आपल्याला शिकवलं आहे. माणुसकीपेक्षा मोठं काही नाही हे आपल्याला या काळाने शिकवलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं .
करोना काळाने आपल्याला माणुसकीचा मंत्र दिला-मोदी
करोना काळानंतर संपूर्ण जग एका वेगळ्या पद्धतीने विचार करु लागलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने एक वेगळा आकार घेतला होता. आता करोना काळानंतर नव्या जिओ पॉलिटिकल इक्वेशनच्या दिशेने जग वळतं आहे. माझ्या कुटुंबीयांना अभिमान वाटेल की तुमचं सामर्थ्य जगाला आकार देतं आहे. आपण सगळेच जण एका निर्णायक ठिकाणावर आहोत. करोना काळात भारताचं सामर्थ्य काय आहे ते जगानं पाहिलं आहे. जगातली अर्थव्यवस्था कोलमडली होती. अनेक महासत्तांवर दबाव होता त्यावेळी आपण देश म्हणून जगाचा विचार केला. जो मानवकेंद्री होता. मानवी संवेदना सर्वात मोठी असते हे कोव्हिडने आपल्याला शिकवलं आहे. माणुसकीपेक्षा मोठं काही नाही हे आपल्याला या काळाने शिकवलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
जगाला भारताविषयी जाणून घ्यायचं आहे-मोदी
भारताचं सामर्थ्य दिवसेंदिवस वाढतं आहे. जगाचा देशावर विश्वास वाढतो आहे. G20 परिषदेचं यजमानपद आपल्याला मिळालं आहे. मागच्या वर्षभरापासून विविध आयोजनं करण्यात आली. या कार्यक्रमांनी सामान्य माणसाचं सामर्थ्य काय आहे ते जगाला दाखवलं आहे. भारतात किती विविधता आहे ते दाखवून दिलं आहे. अशा कार्यक्रमांमुळे जगाला भारत काय आहे ते जाणून घ्यायचं आहे
डिजिटल इंडियाची संपूर्ण जगाला भुरळ पडली आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला सलग दहाव्यांदा संबोधित करत आहेत. काँग्रेस वगळता इतर पक्षाचे पंतप्रधान म्हणून दहाव्यांदा संबोधन करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आज भाषणाला सुरुवात करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आणि देशासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या सगळ्याच स्वातंत्र्य वीरांना नमन करुन देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच भारत आत्ता आपल्या अमृतकाळात आहे. जगासाठी भारत हा आशेचा किरण ठरतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनात सांगितले.
▶️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन, स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांना नमन
जगाला भारताविषयी जाणून घ्यायचं आहे-मोदी
भारताचं सामर्थ्य दिवसेंदिवस वाढतं आहे. जगाचा देशावर विश्वास वाढतो आहे. G20 परिषदेचं यजमानपद आपल्याला मिळालं आहे. मागच्या वर्षभरापासून विविध आयोजनं करण्यात आली. या कार्यक्रमांनी सामान्य माणसाचं सामर्थ्य काय आहे ते जगाला दाखवलं आहे. भारतात किती विविधता आहे ते दाखवून दिलं आहे. अशा कार्यक्रमांमुळे जगाला भारत काय आहे ते जाणून घ्यायचं आहे.
आपला देश सामर्थ्यशाली देश होतोय याचं कारण भारतीयांचं योगदान-मोदी
आपला देश आधुनिकतेकडे वळला आहे. जगातल्या सामर्थ्यशाली देशांमध्ये आपल्या देशाची गणना होऊ लागली आहे. याचं कारण आपल्या देशातल्या शेतकऱ्यांनी केलेले अपार कष्ट, मजूर आणि श्रमिक यांनी दिलेलं योगदान, महिला, मुली यांचं योगदान यांच्या सगळ्यांच्या एकत्रित शक्तीमुळेच देश प्रगती पथावर जातो आहे. मी या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या देशाला पुढे नेण्यात, प्रगती पथावर नेण्यासाठी इंजिनिअर, डॉक्टर्स, शिक्षक, विद्यापीठं, गुरुकुल या सगळ्यांचंही मोठं योगदान आहे. हे सगळे जण भारतमातेचं सामर्थ्य वाढवत आहेत.
देशात कुठल्याही संधींची कमतरता नाही-मोदी
आज छोट्या छोट्या गावातली मुलं, मुली खेळाडू म्हणून पुढे येत आहेत. सॅटेलाइट तयार करुन विद्यार्थी तो आकाशात सोडण्यासाठी सज्ज आहे. मी देशाच्या युवकांना सांगू इच्छितो की आपल्या देशात संधींची कमी नाही. तुम्ही जितक्या संधी मागाल त्यापेक्षा जास्त संधी देण्याची क्षमता आपल्या देशात आहे.
डिजिटल इंडियाची संपूर्ण जगाला भुरळ-मोदी
मी काही दिवसांपूर्वी बाली या ठिकाणी गेलो होतो. तिथे विविध देशांचे प्रतिनिधी आले होते. मला त्यांनी डिजिटल इंडिया विषयी प्रश्न विचारले. दिल्ली, मुंबई, चेन्नई पर्यंतच आमची युवाशक्ती काम करत नाही. तर जगाला त्याची भुरळ पडली आहे. आपल्या देशातली काही शहरं आणि गावं छोटी आहेत, तिथली लोकसंख्या कमी आहे. मात्र स्वप्न पाहणं, नवनिर्मिती करणं यात कुठेही कुणीही कमी पडलेलं नाही.
आपल्याला आपल्या देशाचं गतवैभव परत मिळवायचं आहे-मोदी
आपल्या देशाचं गतवैभव आपल्याला परत मिळवत आपल्याला उभं राहायचं आहे. आपण जो निर्णय घेऊ, जे पाऊल उचलू त्याचा परिणाम पुढच्या एक हजार वर्षांपर्यंत आपली दिशा निर्धारित करणार आहे. माझ्या देशाच्या युवकांना, युवतींना सांगू इच्छितो की तुम्ही भाग्यवान आहात. आज तुम्ही हा काळ पाहता आहात. युवाशक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आमच्या सरकारची नीतीही युवाशक्तीला बळ देणारी आहे. आपल्या देशाच्या युवकांनी पहिल्या तीन स्टार्ट अप सिस्टीममध्ये स्थान मिळवून दिलं आहे. सगळं जग टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. अशात भारताच्या युवकांची जी हुशारी आहे त्याचं वेगळं स्थान असणार आहे.
संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहतो आहे-मोदी
सध्या आपण अशा कालखंडात आहोत की जो भारताचा अमृतकाळ आहे. या कालखंडात आपण जे करु, जी पावलं उचलू, जितका त्याग करु, एका पाठोपाठ एक निर्णय घेऊ त्यानंतर येणाऱ्या एक हजार वर्षांचा इतिहास त्यामुळे लिहिला जाणार आहे. पुढच्या हजार वर्षांवर आजच्या घटनांचा प्रभाव राहणार आहे. नव्या आत्मविश्वासाने आपला देश पुढे जातो आहे. नवे संकल्प करतो आहे. भारतमाता उर्जाची सामर्थ्य होती, पण गुलामीत अडकली होती. आता तो काळ संपला. मागच्या ९ ते १० वर्षात भारताविषयी, सामर्थ्याविषयी जगाला आकर्षण निर्माण झाली आहे.
इतिहासातून आपण काय शिकलं पाहिजे? काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आपण जेव्हा इतिहासाकडे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की इतिहासात अशा काही गोष्टी घडल्या आहेत, ज्या गोष्टी छाप सोडून गेल्या. त्याचा प्रभाव युगांपर्यंत राहतो. सुरुवातीला ती कदाचित छोटीशी घटना वाटते. पण पुढे ती अनेक समस्यांचं मूळ होते. हजार वर्षांपूर्वी देशावर आक्रमण झालं. एका राजाचा पराभव झाला. ही एक घटना एक हजार वर्षांच्या गुलामगिरीत भारताला नेऊ शकेल हे वाटलंही नव्हतं. त्यानंतर गुलामी वाढतच गेली. देशावर आक्रमणं वाढली. ही घटना छोटी होती पण एक हजार वर्षांचा प्रभाव पडला. मी आज तुम्हाला हे सांगतो आहे कारण भारताच्या स्वातंत्र्यवीरांनी या कालखंडात देशाच्या स्वातंत्र्याची मशाल पेटती ठेवली. भारतमातेला ज्या बेड्या पडल्या होत्या त्या सोडवण्यासाठी सगळे लोक मग त्या महिला, मजूर, शेतकरी या सगळ्यांनीच स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न प्रत्यक्षात आलं आहे.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होते आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या घटनेचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. मागील काही आठवड्यांमध्ये ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. त्यात अनेक नागरिकांना आपली जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मात्र, काही दिवसांपासून सातत्याने तेथे शांतता प्रस्थापित झाल्याची बातमी येत आहे. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे.”
गणराज्य दिवसाचं ७५ वं वर्ष -पंतप्रधान नरेंद्र मोदी
या वर्षी आपण जो गणराज्य दिवस साजरा करणार आहोत. त्या दिवशी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्र निर्माणासाठी नवी प्रेरणा, नवे संकल्प आपण करत आहोत. आज माझ्या कुटुंबाला म्हणजेच माझ्या देशाला मी सांगू इच्छितो की नैसर्गिक संकटांमुळे देशात अनेक ठिकाणी आपत्ती आल्या. या आपत्ती ज्यांना सहन कराव्या लागल्या मी त्या सगळ्यांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास त्यांना देऊ इच्छितो.
मीराबाई यांच्या जयंतीचं ५२५ वं वर्ष -मोदी
आज १५ ऑगस्ट हा महान क्रांतीकारक श्री अरविंदो यांची जयंती आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या १५० व्या जयंतीचं वर्ष आहे. राणी दुर्गावतीच्या ५०० व्या जयंतीचं वर्ष आहे. संपूर्ण देश हा उत्सव साजरा करणार आहे. संत मीराबाई ५२५ व्या जयंतीचंही हे पावन पर्व आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना नमन-पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकसंख्येच्या दृष्टीने आपला देश हा क्रमांक १ वर आहे. आज आपला देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो आहे. भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आज मी शुभेच्छा देतो. ज्या वीरांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून योगदान दिलं, आपल्या प्राणांचीही आहुती दिली त्यांना मी नमन करतो. त्यांचं बलिदान, त्यांचं योगदान खूप मोठं आहे म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात आदर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु झालं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहाव्यांदा देशाला संबोधित करत आहेत.आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात मणिपूरचा उल्लेखही केला आहे.