
मुंबई : राज्य सरकार ओबीसींसाठी घरांची नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारकडून या योजनेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ओबीसींना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. लवकरच या संदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर ओबीसींसाठी नव्या घरांची योजना राबवण्यात आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं या योजनेला नाव दिले जाणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा प्रस्ताव आला होता. मात्र तो पूर्ण न झाल्याने शिंदे फडणवीस सरकार हा प्रस्ताव पूर्ण करणार आहे. या प्रस्तावावर काम सुरू असून लवकरच मंत्रिमंडळसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल अशी माहिती ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.