*जालना-* गोरगरिबांच्या दारात हे राजकारणी आले पाहिजे, आपण मराठ्यांनी त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही, मराठा समाजाला मी आवाहन करतो की, प्रवीण दरेकरांच्या अभियानात सहभागी होऊ नका, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अवघे दोन ते तीन दिवस थांबा यांचा पर्दाफाश करतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते आंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधत होते.
*माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही..*
जरांगे पुढे म्हणाले, माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मी तुम्हाला मॅनेज होऊ शकत नाही. मराठ्यांच आंदोलन चिघळण्याचा डाव दिसत आहे. फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला आणखी शत्रू आणि विरोधक मानलं नाही. तुम्ही समजून घ्या, दरेकरांच ऐकून डाव खेळू नका, असा इशारा जरांगे यांनी फडणवीसांना दिला.
*शिंदे समितीला काम करायला लावा*.
विद्यार्थ्यांना ईएसबीसी,ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तिन्ही आरक्षण ठेवावे. खोटी आश्वासन देऊन मुलीबाळींना फसू नका. मुलीना मोफत शिक्षणासाठीच्या अटी शर्ती रद्द करा. आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या त्यांना तातडीने मदत आणि नोकरी द्या, हे सगळे विषय मंत्री शंभूराजे देसाई यांना सांगितले असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली त्याबद्दल समाजाच्या वतीने आभार, त्यांचे कौतुक आहे. मात्र, मुदतवाढ देऊन काम होत नाही. त्यांना काम करायला लावा, नुसत मुदतवाढ देऊन काही अर्थ नाही, असेही जरांगे म्हणाले.
*आता लढा सामान्यांच्या हातात*
मराठा आता पक्षाला महत्त्व देत नाही त्यांना पक्षात राहायची इच्छा राहिली नाही आता लढा सामान्यांच्या हातात आहे. आता टेन्शन घेत नाही. आता लवकर पर्दाफाश होणार आहे. 12 टे 13 संघटना दरेकरांनी फडवणीसांच्या सांगण्यावरून जमा केल्या आहेत. सरकारला वाटत ना विरोधी पक्ष बोलत नाही मला एक कळलं नाही त्यांच्या दारात आपण का जायचं, सरकारनं जावं ना, मराठ्यांनी का? मराठा समाजाची जाब विचारण्याची ताकद आहे.
*मराठ्यांची धास्ती का घ्यायची नाही*
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भाजप अतिचतुर नेत्यांचा पक्ष आहे. त्यांच्या आता लक्षात आलं की मराठे फोडायचे असेल तर याला संपावं लागतं. मराठ्यांची एकजूट आणि चळवळ बदनाम करू नका. नसता मराठ्यांना तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची . मराठ्यांना आरक्षण देऊन टाका कसलेच समीकरण जुळवायची गरज नाही, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.