
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख बागवाडी येथील अंगणवाडी मदतनीस प्रतिभा प्रदीप सावंत यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या.
प्रतिभा सावंत या देवरूख बागवाडी अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी २३ वर्षे या पदावर सेवा केली. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील खेडशी आहे. गुरुवारी दुपारी अंगणवाडीतून घरी गेल्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली. उपचारासाठी रुग्णालयात हजर केले असता त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर खेडशी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.