संगमेश्वर- सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलीत स्कूल ऑफ आर्टस् काॅलेजचा (धामणी संगमेश्वर) येथील विद्यार्थी प्रथमेश हा आवड असलेल्या कला क्षेत्रातील आर्ट्स डिप्लोमा करत असून त्यांनी या कॉलेजमधून तेथील कला शिक्षकांच्या मार्गदर्शनातून उत्तमच अभ्यास, सराव, सातत्य , यांचा नित्यक्रम चालू ठेवला आहेत.
गेले तीन वर्षे ला कॉलेजचा अभ्यास करत असताना नारळ,( शहाळे) पेंटिंग, लाकडी( खारुताई ) शिल्प, असंख्य शिल्प प्रकार व पेंटिंग्स तसेच घरच्या चुलत्यांच्या गणपती माती कामात मदत करतांना अतिशय दर्जेदार मातीकाम, व रंगकाम, रेखीवपणा, सुबक्ता इत्यादी गोष्टींचा सराव सध्या चालू असलेल्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासाबरोबर आळस किंवा हयगय न करता करत आहे.
या क्षेत्रातून सुद्धा उत्तम करियर घडू शकेल, अशी मनाशी खून गाठ बांधून यापुढेही सराव व्हावा, म्हणून दगडातून कोरीव काम सुरू करून एक देखणी सुबक “ शंकराची शिवपिंडी ” दगडी शिल्पही तयार केले आहे. व आपला कलेवरचा विश्वास सार्थ ठरवला आहे. दगडावर घाव घालून दिलेल्या आकारातून तयार झालेली ही शिवपिंडी मकर संक्रात निमित्त एका गावातील प्रसिद्ध देवस्थानला भेट देऊन, त्या गावातील समाजाचा आशीर्वाद व शुभेच्छा मिळवल्या आहेत.
मितभाषी असलेला प्रथमेश लिंगायत जेव्हा घरी बघावं तेव्हा काही ना काही नवनवीन प्रकार करत असतो. याच्याकडून समाजातील असंख्य तरुणाने प्रेरणा घेऊन आपणही आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहावं, असा संदेश देऊन आवडीच्या क्षेत्रात अविरत सराव करणे म्हणजे भविष्यात नक्कीच यशस्वी करियर संपन्न मार्गाकडे वाटचाल चालू आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
.