पूजा खेडकर यांच्या वडिलांचा गंभीर आरोप:म्हणाले- सुजय विखेंविरोधात निवडणूक लढवल्याने मुलीची बदनामी, दबावाखाली कारवाई…

Spread the love

मुंबई- आयएएस पूजा खेळकर यांच्या वडिलांनी महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण येत असल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, माझ्या मुलीला होणारा त्रास हा केवळ माझ्यामुळेच होत आहे. मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळेच माझ्या मुलीची बदनामी झाली. माझ्या मुलीवर खोटे आरोप करण्यात आले. आपल्या विरोधात एफआयआर दाखल असल्याने दबाव होता. त्यामुळे मी इतके दिवस माध्यमांसमोर येऊ शकलो नाही.

मुलीविरोधात दिलेली माहिती चुकीची- दिलीप खेडकर…

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर म्हणाले- माझी मुलगी डॉ. पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी माहिती दिली गेली, ती वस्तुस्थितीला धरून नाही. तिच्या बाबतीत एक फ्रॅाड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती दिली, ती पूर्णपणे चुकीची आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले आहे. माझ्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला होता, म्हणून मला समोर येता आले नाही.

पूजा खेडकर यांच्या वडिलांचा विखेंवर आरोप…

ते पुढे म्हणाले, माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला. मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली. प्रस्थापितांना वाटत होतं उभं राहू नये. या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिला. विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता. त्यांच्याकडे महसूल खाते होते. त्याचा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पण नैसर्गिक न्याय आम्हाला मिळायला पाहिजे होता. तो मिळाला नाही, असा आरोप दिलीप खेडकर यांनी केला.

ओबीसी प्रमाणपत्र खोटं नाही, दबावाखाली कारवाई…

युपीएससीनं जे आरोप केले आहेत. त्यात युपीएससने म्हटलं आहे की पूजा खेडकर यांनी स्वतःचं नाव बदलले. पण तिने नाव बदलले नाही. युपीएससीने कोणाच्यातरी दबावाखाली कारवाई केली आहे. पूजा खेडकर ही वंजारी आहे. ओबीसी प्रमाणपत्र खोटं नाही. त्या वर्गवारीत जे अटेम्प्ट दिले ते योग्य आहेत. पर्सन विथ बेंचमार्कमध्ये 30-40 आजार आहेत. ॲाम्लोपिया हा आजार पूजा खेडकरला आहे. पीएच वर्गवारीत हा आजार 2018 ला आला. दोन्ही वर्गवारीचे अटेम्प्ट वेगवेगळे असल्याचा दावाही पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page