संगमेश्वर : दिनेश अंब्रे – पोलीस ठाणे संगमेश्वर येथील पदोन्नती झालेले पोलीस उपनिरीक्षक श्री.चंद्रकांत तुकाराम कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चिता राहुल कोकाटे ( शेट्ये )यांनी सन्मान केला.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधवी भिडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. शंकर नागरगोजे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. तांबडे मॅडम, पोलीस स्टाफ व महिला दक्षता कमिटी सदस्य सौ. सिद्धी पाथरे, सौ. योगिनी डोंगरे, सौ. दीपिका जोशी, सौ. शितल सुर्वे, सौ. मनीषा चव्हाण उपस्थित होत्या. श्री. चंद्रकांत कांबळे यांना पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्री.कांबळे यांनी त्यांच्या पुढील सेवेमध्येही अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी अशा शुभेच्छा सौ.अर्चिता कोकाटे मॅडम यांनी दिल्या तसेच महिला दिन व महिलांच्या गणपती तसेच विशेष कार्यक्रमावेळी पोलीस ठाणे संगमेश्वर चे पोलीस निरीक्षक अमित यादव साहेब व अधिकारी पोलीस बंधू भगिनी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे असे यावेळी कोकाटे मॅडम म्हणाल्या. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.