निरपराध मुस्लिमांच्या हत्येनंतर…’
अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात जैश ए मोहम्मदची धमकी, हाई अलर्टवर पोलीस

Spread the love

नवी दिल्ली :- पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने शुक्रवारी रात्री अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात धमकी दिली आहे. मंदिराचे उद्घाटन निरपराध मुस्लिमांच्या हत्येनंतर केले जात असल्याचे जैशने एका निवेदनात म्हटले आहे. या धमकीनंतर अयोध्या हाय अलर्टवर आहे. तसेच, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे, असे वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनी म्हटले आहे.
संबंधित वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच देशातील सुरक्षा हाय अलर्टवर आहे. याशिवाय जैशचे निवेदन निनावी आणि पाकिस्तानच्या आयएसआयची प्रॉक्सी असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

‘अल अक्सासारखी होईल राम मंदिराची अवस्था’ –
जैशने अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात धमकी देताना म्हटले आहे की, राम मंदिराची अवस्था अल अक्सा मशिदीसारखी होईल. अल अक्सा मशिद ही इस्लामचे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. गैर-मुस्लिमांना येथे जाण्याची परवानगी आहे. मात्र तेथे प्रार्थना करण्याची परवानगी नाही.
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला दुपारी १२:१५ ते १२:४५ दरम्यान रामलल्लाची ‘प्राण प्रतिष्ठा’ होणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यावेळी उपस्थित असतील. या कार्यक्रमासाठी हजारो पाहुणे उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील ७००० हून अधिक पाहुण्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page