
मुंबई :- मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी राज्य पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. पोलिस महासंचालकांनी राज्यातील पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता साप्ताहिक सुट्टीसह सर्व रजा २८ जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे .
मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमधून २० जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनात सुमारे तीन कोटी मराठे सामील होतील, असे जरांगेनी स्पष्ट केले होते. हे आंदोलक मुंबईत २६ जानेवारी रोजी पोहोचणार आहेत. आंदोलकांच्या मार्गावर राज्यातील पोलिस आयुक्त, अधीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभागाचे जिल्हा युनिट, वाहतूक पोलिस लक्ष ठेवून आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पुरेपर काळजी पोलिस दलाकडून घेतली जात आहे.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात
