शिमगोत्सव शांततेत साजरा करून पोलीसांना सहकार्य करा – पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन…

Spread the love

संगमेश्वर /22 मार्च- संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे ग्रामपंचायत हॉल येथे कडवई, चिखली, मासरंग, शेनवडे, रांगव व शेंबवणे परिसरातील ग्रामस्थांची एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थाना शिमगोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

नुकतीच लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागली असून कोकणातील महत्वाच्या शिमगोत्सवाला ही सुरवात झाली आहे. या पार्शवभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले असून पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशाने ठिकठिकाणी बैठका घेऊन ग्रामस्थाना मार्गदर्शन केले जात आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही नूतन पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अशा बैठका घेतल्या जात आहेत. नुकतीच कडवई येथे कडवई पोलिस बिट च्या अखत्यारीतील गावांची एक बैठक ग्रामपंचायत हॉल येथे घेण्यात आली.

या बैठकीला कडवई, चिखली , मासरंग, शेनवडे, रांगव, शेंबवणे परिसरातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच; तंटामुक्ती अध्यक्ष, गावकर व मानकरी, ग्रामपंचायत सदस्य, रिक्षा संघटना अध्यक्ष व व्यापारी संघटना अध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेला पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी आचारसंहिता व कायदा सुव्यवस्था याबाबत ग्रामस्थाना माहिती दिली. ग्रामस्थांचा समस्या जाणून घेतल्या व पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य कारण्याचे अस्वासन देताना ग्रामस्थसकडून सहकार्याची अपेक्षा केली. यावेळी सुतार यांनी शिमगोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी कडवई सरपंच विशाखा कुवळेकर;उपसरपंच दत्ताराम ओकटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मिलिंद चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, गोपनियचे किशोर जोयशी ग्रामपंचायत सदस्य वसंत उजगावकर, ग्राम विकास अधिकारी कृष्णा भुसारे, चंद्रकांत जाधव, रांगव शेनवडे सरपंच दत्ता लाखन, व्यापारी संघटना अध्यक्ष राजेंद्र बोथरे, सदानंद ब्रीद, नाना सरमोकादम, मुश्ताक सावंत, नजिर जुवळे यांच्यासह सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीची प्रस्तावना पोलीस पाटील संजय ओकटे यांनी केली तर मिलिंद चव्हाण यांनी आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page