
संगमेश्वर/अर्चिता कोकाटे- संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस उपनिरीक्षक श्री. राजाराम चव्हाण यांचे नावडी येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच कायदासाथी दिनेश अंब्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संगमेश्वर पोलीस ठाण्याला वेळोवेळी लाभणाऱ्या पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे नेहमीच दिनेश आंब्रे यांनी स्वागत करून त्यांना सहकार्य करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केलेले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते म्हणून दिनेश अंब्रे यांनी पोलीस खात्याला वेळोवेळी जेवढे शक्य होईल तेवढे सहकार्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे पोलीस खात्यातील प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्यावेळी पदोन्नती मिळाली त्यावेळी त्यांचे प्रत्यक्ष जाऊन त्यांनी गुलाब पुष्प, पुष्पगुच्छ, पुस्तक,भेटवस्तू देऊन सन्मान आणि सत्कार केलेले आहे व त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केलेले आहेत.