
मुंबई- ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी झाले आहे. त्यामुळे ठाणे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सेनादलाच्या सन्मानार्थ या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले असल्याचे दिसून आले.
पहलगाम मध्ये आमच्या बहिणीचे कुंकू पुसले गेले. त्याचा ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून बदला घेतला गेला आहे. ‘खून का बदला खून’ आणि ‘ईट का जबाब पत्थर से’ आणि आता तर गोळी चालली तर त्याचा बदला तोफ चालवून दिला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणाले आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैनिकांचे देखील अभिनंदन करतो. असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळेच आपण ही तिरंगा रॅली काढली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
असा पंतप्रधान आजपर्यंत आपल्याला मिळाला नव्हता – एकनाथ शिंदे…
ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झाले आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे देशातील तिन्ही सेनेचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांनी हे कर्तृत्व दाखवले आहे. ते आपल्या देशाच्या सैन्याच्या मागे उभे राहिले आहेत. असा पंतप्रधान आजपर्यंत आपल्याला मिळाला नव्हता. ही खूप मोठी गोष्ट आहे. देशभक्त आणि राष्ट्रभक्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी खूप खूप अभिनंदन करत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.