रस्ता अपघात किंवा वाहनाच्या धडकेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु विचार करा जर एखादे वाहन किंवा गाडी कोणत्याही चालकाशिवाय धावत आहे, तर कदाचित तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक ऑटोरिक्षा ड्रायव्हरशिवाय रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत आहे.
ही घटना खरं तर महाराष्ट्रातील रत्नागिरीतील आहे. येथे असलेल्या एका मार्केटमध्ये रस्त्यावरील दृश्य पाहून काही लोक घाबरले आणि त्यांना वाटले की कदाचित तेथे भूत आले असावे. इथे एक ऑटोरिक्षा ड्रायव्हरशिवाय रस्त्यावर फिरत असल्याचे लोकांनी पाहिले. हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. लोक मोबाईलवरून व्हिडिओही बनवू लागले.
हे पाहून रिक्षा चालकाशिवाय कशी चालते हे लोकांना समजले नाही. काही लोकांनी ही रिक्षा थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण ती थांबली नाही आणि चालू राहिली. अखेर गर्दीतील काही लोक पुन्हा पुढे आले आणि खूप प्रयत्नानंतर रिक्षा थांबवली. या दरम्यान कोणालाही दुखापत झालेली नाही, ही चांगली गोष्ट आहे.
सत्य शेवटी समोर आले आणि चालक नसताना रस्त्यावर रिक्षा कशी धावली हे लोकांना समजले. याठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. स्टेरिंग लॉकमुळे सुमारे दोन मिनिटे रिक्षा चालकाविना रस्त्यावर फिरत राहिली. सध्या त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.