उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )
दिघोडे गावातील जनतेने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत भरघोस मताधिक्यांनी निवडून देऊन काँग्रेस – शेकाप महाआघाडीचा झेंडा दिघोडे ग्रामपंचायतीवर फडकविला आहे.या दिघोडे गावातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावणार असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास दिघोडे गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी सरपंच पदग्रहण सोहळ्यात दिघोडे ग्रामपंचायत येथे जमलेल्या जनसमुदाया समोर व्यक्त केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र पालव यांच्या अधिपत्त्याखाली दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे किर्तीनिधी ठाकूर यांनी शुक्रवारी हाती घेतली.त्यानंतर सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली दिघोडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अभिजित वसंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांना संबोधित करताना नवनिर्वाचित सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी सांगितले की दिघोडे गावातील माजी सरपंच काशिनाथ पाटील,माजी सरपंच अविनाश पाटील, पांडुरंग कोळी तसेच काँग्रेस, शेकापचे ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अंतर्गत रस्ते,गटारे, स्मशानभूमी, प्राथमिक शाळेची इमारत तसेच जनतेच्या निगडित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ मनिष पाटील, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,माजी सरपंच काशिनाथ पाटील, माजी सरपंच अविनाश पाटील, नारायण कोळी, अनिल पाटील, श्रावण घरत, संदिप जोशी,रमण पाटील, रमेश कोळी, शिवदास पाटील, प्रफुल्ल पाटील, सुरेश पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संकीता जोशी, माजी उपसरपंच अनंत म्हात्रे,ग्रामपंचायत सदस्य अलंकार कोळी,आरती कोळी,रेखा कोळी, कैलास म्हात्रे, उज्ज्वला म्हात्रे, संदेश पाटील, अपेक्षा पाटील, अपेक्षा कासकर, निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र पालव, ग्रामसेविका मत्स्यगंधा पाटील,काँग्रेस व शेकापचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच किर्तीनिधी ठाकूर, उपसरपंच अभिजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.