ठाणे: निलेश घाग डोंबिवली ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सी.एस.एम.टी) कडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेमधून पडून आकाश कुमार पांडे (२४, दिवा,खर्डी गाव, हा प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.१० वाजण्याच्या दरम्यान दिवा रेल्वे स्थानकाजवळ घडली. त्याच्यावर कळव्यातील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
ठाण्याच्या सुभाषनगर,टाटा कॅपिटल या खासगी कंपनीमध्ये आकाश नोकरीला असून तो दिवा,खर्डी गावात वास्तव्याला आहे. दिवा रेल्वे स्थानकातून २५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ३ मिनिटांच्या सी.एस.एम.टी.कडे जाणाऱ्या लोकल मध्ये तो शिरला. जागा नसल्यामुळे तो दरवाजा जवळच उभा होता. रेल्वे काही अंतरावर गेल्यानंतर ४०/२३३-ए आणि १३६ या किलो मीटर अंतराच्या दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तो लोकलमधून खाली पडला. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने दिवा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याला दाखल केले. त्याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात