‘मी जमीनदेखील द्यायला तयार’, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य..

Spread the love

“माझा प्रत्येक क्षण मी जिल्ह्याच्या विकासासाठी द्यावा अशी माझी इच्छा आहे. तर जिल्ह्यातील 10 हजार युवकांना रोजगार देण्यासाठी उद्योग आणण्याची माझी इच्छा आहे. मी ज्या ही गावात जात आहे त्या गावातून मला लोक सांगत आहेत की ताई तुम्ही आमच्यासाठी हे आणले इतके दिले आहे म्हणून माझा विश्वास दृढ होत आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘मी जमीनदेखील द्यायला तयार’, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे..

बीड- भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज अंबाजोगाईच्या दौऱ्यादरम्यान मोठी घोषणा केली आहे. “बीड जिल्हा असा आहे तसा आहे मी ही ओळख पुसून टाकणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये 10 हजार लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने जमीन देखील द्यायला तयार आहे. जिल्ह्यामध्ये एखादं मोठं चांगलं मेडिकल कॉलेज हवं, असं माझं स्वप्न आहे”, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यात सर्वत्र झंझावात दौरा सुरू आहे. त्यांनी आज अंबाजोगाई शहरातील प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांनी व्यापारी संघटनेच्या लोकांची भेट घेतली. यावेळी व्यापारी संघटनेच्या लोकांनी पंकजा मुंडें यांना म्हटलं की, आपले वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी अंबाजोगाईसाठी खूप काही दिलं आहे. म्हणून आपण लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहोत. मात्र आपण आजच अर्धी लढाई जिंकली आहे, असं देखील ते म्हणाले.

यावेळी उपस्थितांना संवाद साधताना पंकजा मुंडें म्हणाल्या की, “आत्तापर्यंतच्या राजकारणात मुंडे साहेबांना कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण मुंडे साहेबांना आपण निवडून देण्याचे काम आपण केले आहे. राजकारणात क्षणोक्षणी बदल घडत आहेत. डायनॉमिक राजकारण होत आहे. कोण कधी कोणासोबत येणार हे अचानकपणे समोर येत आहे.” तसेच “माझी उमेदवारी भारतीय जनता पक्षाने ठरवली आहे. माझे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या अचानक जाण्याने असं काय बदल झाले की त्यांची जागा मला घ्यावी लागली? आता राजकारणामध्ये इतके बदल होत आहेत की रोज कळत नाही. गोपीनाथ मुंडे देखील 85 साली हारले होते. विलासराव देशमुख देखील हारले होते. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी देखील हरल्या होत्या”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘आता भांडायची गरज नाही’


“योगायोग राष्ट्रवादी आता आमच्यासोबत आली आहे. आता भांडायची गरज नाही. मी धनंजय मुंडेंना बोलले, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी बोला. मी माझ्या कार्यकर्त्यांना बोलेन. मोदींनी जी यादी दिली त्यामध्ये माझं नाव आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रमध्ये फिरावे लागेल”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मी पालकमंत्री असताना प्रीतम ताई यांनी त्या कामाचे उद्घाटन केली आहेत. मी आपल्याला खूप काही भरभरून दिले आहे. बीड जिल्ह्यासाठी रेल्वे येणे शक्य नव्हते. मात्र मुंडे साहेबांमुळेच आम्ही ही रेल्वे आणू शकलो. बीड जिल्ह्याला 10 हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला वेडा घालणारे आणले. सरकार बदलले. अजित पवार यांचे सरकार आले आणि या काळात माझा भाऊ धनंजय मुंडे या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला. अन् त्यानेही बीड जिल्ह्याची कामे केली”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“माझा प्रत्येक क्षण मी जिल्ह्याच्या विकासासाठी द्यावा अशी माझी इच्छा आहे. तर जिल्ह्यातील 10 हजार युवकांना रोजगार देण्यासाठी उद्योग आणण्याची माझी इच्छा आहे. मी ज्या ही गावात जात आहे त्या गावातून मला लोक सांगत आहेत की ताई तुम्ही आमच्यासाठी हे आणले इतके दिले आहे म्हणून माझा विश्वास दृढ होत आहे. माझ्या विरोधातील लोकांनाही मी त्रास देत नाही. माझ्यावर फिरूनफिरून एकच आरोप होतो की मी फोन उचलू शकत नाही. कारण दिवसातील 18 तास मी काम करत आहे”, असंही पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page