बीड – भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलंय. यावेळी पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक झालेल्या बघायला मिलाल्या.
गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला. पण तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदं मिळाली. पण आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे आता आपण आपल्या नेत्यांशी चर्चा करणार, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “मी अमित शहा यांची भेट घेणार आहे. अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं पंकजा म्हणाल्या. “माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कुणासमोरही झुकणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या.
दरम्यान पंकजा मुंडेंचा रोष नेमका कुणाकडे होता हे समोर आलेलं नाही.मात्र, त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगत आहेत.