
जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेरमधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. पठाण खान असे या गुप्तहेराचे नाव आहे. तो भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवत होता. पठाण खान हा आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेसाठी काम करत होता.
राजस्थानमध्ये इंटेलिजन्सच्या पथकाने महिन्याभरापूर्वी पठाण खान याला अटक केली. त्याची महिनाभर चौकशी सुरू होती. आता त्याच्या विरुद्ध १९२३ च्या अधिकृत गुपिते कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पठाण खान याला १ मे २०२५ रोजी गुन्हा नोंदवून औपचारिक अटक करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार, पठाण खान पहिल्यांदा २०१३ मध्ये पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी गेला होता. यानंतरही अधूनमधून तो पाकिस्तानमध्ये जाऊन आला आहे. पठाण खानने अनेकदा भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवली आहे. पठाणने नेमकी कोणकोणती माहिती पाकिस्तानला दिली आहे. या माहितीचा पाकिस्तानकडून गैरवापर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार पठाण खानला पाकिस्तानकडून वेगवेगळ्या मार्गान हेरगिरीसाठी पैसा दिला जात होता.