महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला दुबईत अटक..

Spread the love

नवी दिल्ली,13 डिसेंबर- महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच्या मालकांपैकी एक असलेल्या रवी उप्पलला ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे स्थानिक पोलिसांनी दुबईत ताब्यात घेतले आहे. अशी माहिती अधिकृत आज देण्यात आली. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी त्याला भारतात पाठवण्यासाठी दुबई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

माहितीनुसार, सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी रवी उप्पल महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच्या दोन मुख्य मालकांपैकी एक आहे. ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने रवीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. त्या आधारे दुबई पोलिसांनी रवीला ताब्यात घेतले आहे. ईडी व्यतिरिक्त छत्तीसगड पोलिस तसेच मुंबई पोलिस देखील उप्पल विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करत आहेत. सट्टेबाजीशी संबंधित या मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने ऑक्टोबरमध्ये छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला होता. उप्पल आणि दुसरे महादेव ॲप प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. नंतर ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने रेड नोटीस जारी केली. ईडीने आरोपपत्रात न्यायालयाला सांगितले होते की, उप्पलने पॅसिफिक महासागरातील वानुआतु या बेट – देशाचा पासपोर्ट घेतला होता. मात्र, त्यांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडलेले नाही. ईडीच्या म्हणण्यानुसार उप्पलचे उत्पन्न गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. यासोबतच कोट्यवधी रुपये लपवण्यातही त्याचा हात आहे.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने महादेव बुक आणि रेड्डीअण्णा प्रेस्टोप्रोसह २२ बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दि. ५ नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते. बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप सिंडिकेट आणि त्यानंतर छत्तीसगडमधील महादेव बुक ॲपवर टाकलेल्या छाप्यामध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या तपासानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते. या कारवाईनंतर ॲपचे बेकायदेशीर प्रकरण उघडकीस आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page