दिव्यांग, वयोवृद्धांचे आजपासून गृह मतदान:34 हजारांपैकी केवळ ३ हजार मतदारांनीच केला आहे सुविधेसाठी अर्ज…

Spread the love

अकोला- विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने दिव्यांग व ८५ वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, शनिवारपासून गृह मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या तारखांना गृह मतदान होणार आहे. अकोला पूर्वमध्ये ९ व १० नोव्हेंबर रोजी ही प्रक्रिया होणार आहे. दिव्यांग व ८५ वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध मतदारांंची संख्या ३४ हजार ६१५ आहे. मात्र, गृहमतदानसाठी २ हजार ९१५ मतदारांनी अर्ज भरून दिले. लोकसभा निवडणुकीत ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, हे उद्दिष्ट साध्य झाले नाही. त्यामुळे विधानसभेत जास्तीत-जास्त मतदान होण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यात पाचही मतदारसंघात ८५ वर्षांवरील १८ हजार ९०५ तर दिव्यांग १५ हजार ७१० मतदार आहेत. यासाठी २२ ते २७ ऑक्टोबरच्या दरम्यान बीएलओंनी मतदारांशी संपर्क साधला. पाच दिवस चाललेल्या प्रक्रियेत ८५ वर्षांवरील २०९४ व ८१९ दिव्यांग इतर दोघांनी अशा २९१५ मतदारांनी फॉर्म १२ डी बीएलओंकडे भरून दिला आहे. आता मतदानाच्या काही दिवस आधी कर्मचारी प्रत्यक्ष संबंधित मतदारांच्या घरी जावून गृह मतदान करून घेतील.

प्रभावी प्रसिद्धीच नाही

गृह मतदान हे ऐच्छिक आहे. केवळ मतदानाचा टक्का वाढवा यासाठी आयोगाने ही संकल्पना सुरू केली आहे. मात्र वेळ मारून नेण्याएवढीच प्रसिद्धी झाली. प्रत्यक्ष गाव भेटी देऊन किंवा विशेष मोहीम राबवून याचा प्रचार-प्रसार इतर मोहिमेच्या तुलनेत कमी कमी केला. त्यातच केवळ पाच दिवस अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. मतदारसंघ वृद्ध दिव्यांग अकोट ३६३ १४३ बाळापूर ५१४ २६२ अकोला प. ३१५ १०८ अकोला पू.- ५६४ २०० मूर्तिजापूर ३३८ १०६ एकूण २०९४ ८१९

यांची झाली आहे नोंद निवडणूक आयोगाने ४० टक्केपेक्षा जादा अपंगत्व असलेल्या मतदारांची नोंद दिव्यांग म्हणून केली आहे. तसेच ज्या व्यक्तीला बेंचमार्क अपंगत्व आलेले आहे अशा मतदारांना अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून, त्याचप्रमाणे ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार जे मतदान केंद्रापर्यंत स्वतः जाऊ शकत नाही, अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page